Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Today Breaking News LIVE Updates: 'नीट' परीक्षेसंदर्भातील गोंधळाबरोबरच आज 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं काम काजाकडे विशे, लक्ष असणार आहे. राज्यामध्येही राजकीय बैठकींचे सत्र सुरु आहे. दुसरीकडे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचीही जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. या प्रकरणात आता निलंबनाचा बडगा उगारला जात आहे. या आणि अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

25 Jun 2024, 13:09 वाजता

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर असणार आहे. यावेळी महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य भाजपमध्ये दुर्लक्षित असलेल्या नेत्यांना आता दिल्लीतून संपर्क सुरू आहेत. राज्यातील भाजपची स्थिती सुधारण्यासाठी काय करावे लागेल? याची माहिती घेतली जातेय. केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबई दौऱ्यावर काही जुन्या जाणत्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी दोन्ही नेते चर्चा करणार आहे. चर्चेअंती एक अंतिम अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सोपवला जाणार आहे. या अहवालानंतर केंद्रातून अॅक्शन प्लान तयार होणार आहे. 

25 Jun 2024, 12:30 वाजता

मुंबईला 20-22 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक; 2 धरणं झाली रिकामी

मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.30 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उरला आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा असून ही धरणं पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने रिकामी झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

25 Jun 2024, 11:21 वाजता

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा

लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 100 जागा लढवण्याचा मानस असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडून जागांची निश्चिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेच्या प्रत्येक पक्षाचा जागा निश्चित झाल्या की शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

25 Jun 2024, 09:48 वाजता

कोल्हापूरमधील सर्व रिक्षा-टॅक्सी आज बंद

पासिंग दंडाविरोधात आज कोल्हापुरात रिक्षा बंद आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील 16 हजार रिक्षा आणि टॅक्सीचालक आज संपावर गेलेत. उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हा संप सुरु राहाणार आहे. या संपामुळे कोल्हापुरकरांचे हाल होत आहेत.

25 Jun 2024, 09:43 वाजता

पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे नातेवाईक मुख्यमंत्र्यांना भेटले

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात निरीक्षणगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या नातेवाईकांनी, मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. दरम्यान, या मुलाला बेकायदेशीरपणे निरीक्षणगृहात ठेवल्याचं सांगत, त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

25 Jun 2024, 09:41 वाजता

भाजपाला सोडचिठ्ठी देणारी महिला नेता शरद पवार गटात करणार प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी नुकताच भाजप पक्षाला रामराम ठोकला.

25 Jun 2024, 09:39 वाजता

फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरणार

UPSC परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षांर्थींची ओळख पटविण्याकरिता फेशियल रेकग्निशन तंत्राचा वापर केला जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित होणारे सीसीटीव्ही यांचा वापर करण्याचे यूपीएससीनं ठरवलं आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखले जाण्याची शक्यता आहे.

25 Jun 2024, 09:29 वाजता

लातूरमध्ये विद्यार्थ्यांचीही चौकशी

लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणी आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमरग्याच्या इराण्णा कोनगलवारच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळेस त्याच्या घरात 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली. ज्या विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीट आहेत, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पोलीस चौकशीला बोलवणार आहेत.

25 Jun 2024, 09:28 वाजता

नीट तपासाच्या कक्षा वाढवल्या

NEET पेपर फुटीप्रकरणात CBI कडून तपासाच्या कक्षा वाढवल्या आहेत.  बिहार, गुजरात आणि राजस्थानमध्ये पाच प्रकरणांवर सीबीआयचा तपास सुरु आहे. डमी परिक्षार्थींबाबतही  CBI तपास करणार आहे.

25 Jun 2024, 09:27 वाजता

आणीबाणीविरोधात आज भाजपाची देशभर आंदोलनं

आणीबाणीविरोधात भाजपची आज देशभरात आंदोलनाची तयारी. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षाध्यक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.