Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Today Breaking News LIVE Updates: 'नीट' परीक्षेसंदर्भातील गोंधळाबरोबरच आज 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं काम काजाकडे विशे, लक्ष असणार आहे. राज्यामध्येही राजकीय बैठकींचे सत्र सुरु आहे. दुसरीकडे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचीही जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. या प्रकरणात आता निलंबनाचा बडगा उगारला जात आहे. या आणि अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

25 Jun 2024, 09:25 वाजता

लोकसभाअध्यक्ष पदासाठी नामांकनं

संसदेच्या अधिवेशनात आज दुस-या दिवशी लोकसभाअध्यक्ष पदासाठी नामांकनं भरली जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांच्यात बैठक सुरु होती.