Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Today Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...

Breaking News LIVE Updates: अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केली अटक

Today Breaking News LIVE Updates: 'नीट' परीक्षेसंदर्भातील गोंधळाबरोबरच आज 18 व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं काम काजाकडे विशे, लक्ष असणार आहे. राज्यामध्येही राजकीय बैठकींचे सत्र सुरु आहे. दुसरीकडे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचीही जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. या प्रकरणात आता निलंबनाचा बडगा उगारला जात आहे. या आणि अशा इतर अनेक घडामोडी पाहूयात या लाइव्ह ब्लॉगमध्ये...

25 Jun 2024, 22:35 वाजता

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने तिहार जेलमधून अटक केली आहे. सुप्रीम कोर्टात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार होती.
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने तिहार तुरुंगातच सीएम केजरीवाल यांची चौकशी केली आहे. यानंतर केंद्रीय संस्थेने त्याला अटक केली. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याला उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून एजन्सी त्याची कोठडी मागणार आहे.

 

25 Jun 2024, 21:03 वाजता

एका तरूण तरूणीला क्षुल्लक कारणावरून जमावाने बेदम मारहाण केलीये... संभाजीनगरमध्ये सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ ही घटना घडलीये... हे तरुण तरुणी रस्त्यावर गप्पा मारत उभे होते, हे बघताच समाज सुधारणेचा ठेका घेतलेले परिसरातील समाजकंटक आणि टवाळखोर टोळकं त्याठिकाणी आलं आणि त्यांनी या तरूण आणि तरूणीला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीचा हा व्हीडिओ आता व्हायरल झालाय. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थीती नियंत्रणात आणली..

25 Jun 2024, 20:21 वाजता

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली आहे. टोपी आणि मास्क घालून अल्पवयीन आरोपीला बाहेर काढण्यात आलं. होंडा सिटी गाडीतून तो घराकडे रवाना झाला. आज दुपारी मुंबई हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजुर केला करत तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. 

25 Jun 2024, 18:37 वाजता

राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.                       

25 Jun 2024, 17:48 वाजता

मु्ंबईत सह्याद्री गेस्ट हाऊस जवळ उभ्या असलेल्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. एका वाहनचालकांना ताफ्यातील गाडीला धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.

25 Jun 2024, 17:03 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना इशारा

पीक कर्ज देताना बँकांनी शेतक-यांकडे CIBILची मागणी केल्यास त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना हा इशारा दिलाय. राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी फडणवीसांनी हा इशारा दिलाय. गेल्यावेळी सुद्धा तेच सांगितले मात्र, बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज असल्याचं फडणवीस म्हणालेत.

25 Jun 2024, 16:09 वाजता

भुजबळांनी काडी लावली, मराठा एक झाले- मनोज जरांगे

मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालो होतो. आरक्षणाची लढाई आता आपण अंतिम टप्प्यात आणली आहे, मरणाची शेवटची घटका मोजेपर्यंत मी समाजाजासोबत आहे. आपल्यासोबत कुणीही जातीयवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या तरी आपण जातीयवाद करायचा नाही. आपल्याला अंतर वालीतील कुणी कितीही दुखावलं तरी आपण एकही शब्द बोलायचा नाही. ज्यांनी आपल्या विरोधात आंदोलन केले ते आपले शिवभाऊ आहेत आपण त्यांना दुखवायचं नाही. छगन भुजबळ यांचं दंगल होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

25 Jun 2024, 15:17 वाजता

पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर

पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Car Accident) अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन (bail) मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने कोर्टात याचिका केली होती. ही आटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आलं होतं. 

25 Jun 2024, 14:43 वाजता

नीट पेपर फुटी प्रकरणी संजय जाधव याला 6 दिवसांची पोलीस कोठडी 

नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये मध्यरात्री अटक करण्यात आलेला आरोपी संजय जाधव याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. त्याला आज न्यायालयात हजर केलं होतं. तर जलील पठाण याला कालच न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.

25 Jun 2024, 14:07 वाजता

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात आज हंटर मोर्चा 

बँकेतील घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करावी,तसेच प्रशासक नेमून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवर हा मोर्चा काढण्यात येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा हंटर मोर्चा काढण्यात येणार असून शहरातील स्टेशन चौक येथून जिल्हा बँके पर्यंत हा मोर्चा निघणार आहे.