Dahi Handi 2023 LIVE: दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साह, राजकीय नेत्यांची हजेरी

Mumbai Dahi Handi 2023 LIVE: देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा उत्साह दिसून येतो आहे. 

Dahi Handi 2023 LIVE: दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साह, राजकीय नेत्यांची हजेरी

Janmashtami Dahi Handi 2023 in Mumbai : जन्माष्टमीचा शुभ सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्साह रंगात आहे. पावसामुळे या उत्साहाला अजून रंगत चढली आहे. 

7 Sep 2023, 08:39 वाजता

Dadar Dahi Handi Live: मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय. दादरमध्ये साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडीला महिला गोविंदा पथकाने 5 थर लावत सलामी दिली.

7 Sep 2023, 08:35 वाजता

Thane Dahi Handi Live : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनीदेखील दहीहंडीचे आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे या दहीहंडीला हजेरी लावणार आहेत. 

7 Sep 2023, 08:34 वाजता

Thane Dahi Handi Live : ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान ही प्रसिद्ध दहीहंडी आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्याशिवाय अभिनेता सुनिल शेट्टी, चंकी पांडेसह अनेक बॅालिवुड स्टार, अवधुत गुप्ते आणि मराठी सिने सृष्टीमधील कलाकार गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी येणार आहे. 

7 Sep 2023, 08:33 वाजता

Thane Dahi Handi Live : ठाणे शहरात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे संध्याकाळी या दहीहंडीचा उत्साह पाहण्यासाठी येणार आहेत. जो गोविंदा पथक 10 थर यशस्वी रचेल त्याला 11 लाखाच पारितोषिक देण्यात येणार आहे. 

7 Sep 2023, 08:29 वाजता

Thane Dahi Handi Live :  वर्तक नगरमध्ये प्रो गोविंदाचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्व विक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते वरूण धवन, विकी कौशल, आयुष्यमान खुराणा यांच्यासह इतर सेलिब्रिटीची गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी येणार आहेत. 

7 Sep 2023, 08:10 वाजता

Thane Dahi Handi Live : ठाण्याच्या टेंभीनाक्यात दहीहंडीचा (Tembhi Naka Dahi Handi) उत्साह आहे.. रात्रीपासूनच टेंभीनाक्यात गोविंदा पथकं दाखल होऊ लागलीत.. धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा साजरा होतोय. रात्रीपासूनच टेंबीनाक्यावर गोपाळकाला उत्सव सुरु झालाय. टेंभीनाक्याची हंडी ही ठाण्यातील मानाची हंडी असते... मुंबईतील गोविंदा पथकासाठी आणि ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1 लाख रुपयांचं, सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12 हजार, सहा थरांसाठी 8 हजार, पाच थरांसाठी 6 हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. 

7 Sep 2023, 07:06 वाजता

Mumbai Dahi Handi Live : मुंबईतील अजून प्रसिद्ध दहीहंडी आहे ती म्हणजे दादर शिवसेना भवनासमोर आयोजित करण्यात येणारी. युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडी दरवर्षी आयोजित करण्यात येते. यंदा दहीहंडीतून एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. 

7 Sep 2023, 07:04 वाजता

Mumbai Dahi Handi Live : घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांची मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडी आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयोगमंत्री उदय सामंत हजेरी लावणार आहेत. तर राम कदम यांची दहीहंडी ही बॉलीवूड कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी रोहित शेट्टी, विकी कौशल, कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र आदी सेलिब्रेटी हजर राहणार असल्याचं समजतं. 

7 Sep 2023, 06:59 वाजता

Janmashtami Live : पंढरपुरात विठ्ठल मंदिरात मध्यरात्री कृष्णजन्म सोहळा साजरा झाला. देवाला गोपाळ रूपातील पोशाख केला होता. हातात चांदीची काठी, अंगावर शाल, डोक्यावर पागोटे असा सुंदर पोशाख करण्यात आला होता. कृष्ण जन्म पाळणा म्हणत मोठ्या उत्साहात साजरा झाला..

7 Sep 2023, 06:58 वाजता

Mumbai Dahi Handi Live : मुंबईतील प्रसिद्ध वरळी जांबोरी मैदानातील दहीहंडी ही आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील आहे. यंदा भाजपकडून भ्रष्टाचाराची हंडी इथे फोडली जाणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. तर आदित्य ठाकरेही यावेळी येणार आहे.