Janmashtami Dahi Handi 2023 in Mumbai : जन्माष्टमीचा शुभ सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्साह रंगात आहे. पावसामुळे या उत्साहाला अजून रंगत चढली आहे.
7 Sep 2023, 06:52 वाजता
Mumbai Dahi Handi Live : दादर आयडीयल दहिहंडी ही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित केली जाते. गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी इथे दरवर्षी मराठी कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि दिव्यांग दहीहंडीचं इथे आयोजन केलं जातं.
7 Sep 2023, 06:52 वाजता
Mumbai Dahi Handi Live : दादर आयडीयल दहिहंडी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित केली जाते. गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी इथे दरवर्षी मराठी कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि दिव्यांग दहीहंडीचं इथे आयोजन केलं जातं.
7 Sep 2023, 06:51 वाजता
Janmashtami Dahi Handi Live : जन्माष्टमीनिमित्त नोएडामधील इस्कॉन मंदिरात मंगल आरती करण्यात आली.
#WATCH | UP: Mangala Aarti underway in Noida Iskcon temple, on the occasion of #Janmashtami pic.twitter.com/U0I5878Um9
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 6, 2023
7 Sep 2023, 06:48 वाजता
Janmashtami Dahi Handi Live : भगवान कृष्णांच्या भक्तांनी मंदिरांमध्ये एकच गर्दी केली. मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले. मंदिरासोबत घरोघरी जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात आला.
#WATCH | UP: Mangala aarti underway in Krishna Janmabhoomi temple in Mathura, on the occasion of #Janmashtami pic.twitter.com/DSV80e7mbD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 7, 2023
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4