Janmashtami Dahi Handi 2023 in Mumbai : जन्माष्टमीचा शुभ सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्साह रंगात आहे. पावसामुळे या उत्साहाला अजून रंगत चढली आहे.
7 Sep 2023, 09:24 वाजता
Thane Dahi Handi Live : मागाठाणे (Magathane Dahi Handi) तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी कलाकार देखील उपस्थित राहणार
7 Sep 2023, 08:55 वाजता
Dahi Handi Latest News : दहिहंडीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार संभाव्य गरज लक्षात घेऊन महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
7 Sep 2023, 08:55 वाजता
Dahi Handi Latest News : दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात 10, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात 07 रूग्णशय्या आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 4 रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच 16 उपनगरीय रूग्णालयातही 105 रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 5 ते 10 खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
7 Sep 2023, 08:53 वाजता
Pune Traffic News Today : पुण्यात आज दहीहंडी उत्सव निमित्ताने प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय...शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी 5 ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात येणारंय..
7 Sep 2023, 08:53 वाजता
Mumbai Govinda : जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज झालीयेत. नायर, केईएम, सायन रुग्णालयात जखमी गोविंदासाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्यात. यावेळी त्यांना लागणारी औषधे रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलीये.
7 Sep 2023, 08:52 वाजता
Mumbai Best Bus News Today : मुंबईत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. अंधेरी, रावळपाडा, कन्नमवार नगर, मानखुर्द अशा अनेक दहीहंडीचे मंडप बांधल्यामुळे बेस्टचे मार्ग वळवण्यात आलेत.
7 Sep 2023, 08:50 वाजता
Thane Dahi Handi Live : ठाण्यात आज दहीहंडीनिमित्त वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. शहरात संपूर्ण दिवस जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणाराय. तर सर्व मुख्य दहीहंडीच्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात येणाराय.
7 Sep 2023, 08:49 वाजता
Nagpur Dahi Handi Live : नागपुरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय.... बडकस चौकामध्ये गोकुळाष्टनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत 8 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता..6 थरावर ही दहीहंडी फोडण्यात आली...यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते..
7 Sep 2023, 08:46 वाजता
Mumbai Rain : दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन झालंय. मुंबईतल्या दादर परिसरात पावसानं हजेरी लावली. एकीकडे दहीहंडीचा उत्साह आणि दुसरीकडे पाऊस...असा आनंद इथं जमलेले नागरिक घेतायत.
7 Sep 2023, 08:44 वाजता
Dadar Dahi Handi Live: मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय. दादरमध्ये साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडीला महिला गोविंदा पथकाने 5 थर लावत सलामी दिली.