Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद (संभाजीनगर), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. तर आध्रंप्रदेशमधील 25, बिहारमधील 5, छत्तीसगडमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, तेलंगणामधील 17, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालच्या 8 जागांचा समावेश आहे. तसेच चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 

12 May 2024, 14:14 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमधील काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षाचा भाजपात प्रवेश

नाशिकचे काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेवाळे यांच्यासोबत भाजपत प्रवेश घेतला. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी तुषार शेवाळे इच्छुक होते. उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसने त्यांना थांबाविण्याचा प्रयत्न केला नाही. तात्काळ त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला होता. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हा मोठा धक्का लागला आहे.

12 May 2024, 11:20 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : पालघरच्या उमेदवारासाठी प्रकाश आंबेडकरांची बोईसरमध्ये जाहीर सभा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका सुरु, वंचित बहुजन आघाडीच्या पालघरच्या उमेदवार विजया म्हात्रेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर बोईसरमध्ये जाहीर सभा, आज दुपारी 2 वाजता सभेला होणार सुरुवात

12 May 2024, 11:18 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : संजय दिना पाटलांसाठी आदित्य ठाकरेंची भव्य सभा

ईशान्य मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटलांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख भव्य सभा घेणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता भांडूपमध्ये जाहीर सभा होणार आहे. 

12 May 2024, 11:14 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : यामिनी जाधवांच्या प्रचारासाठी राहुल नार्वेकरांची भव्य सभा

दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या लोकसभा उमेदवार यामिनी यशवंत जाधवांच्या प्रचारार्थ राहुल नार्वेकरांनी भव्य सभेचं आयोजन केलं. कुलाबा विधानसभा मतदार संघात रात्री साडेआठ वाजता ही सभा होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, रामदास आठवलेंसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

12 May 2024, 11:11 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे-राऊतांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, भाजपची टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर टीका केलीय. ठाकरे-राऊतांची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं म्हणत बावनकुळेंनी 5 प्रश्नांची यादीच ट्विट केली आहे.

12 May 2024, 11:09 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकतील, संजय राऊतांचा विश्वास

महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तर 15 तारखेला पुन्हा नाशिक दौरा काढून मनपातील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार असल्याचं सुतोवाचही राऊतांनी केलं. तर बावनकुळेंनी ठाकरेंच्या मुलाखतीवर केलेल्या टीकेचाही राऊतांनी समाचार घेतलाय.

 

12 May 2024, 11:08 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : संभाजीनगरातील मोबाईलच्या दुकानातून 39 लाख रुपये जप्त

संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा मोबाईल दुकानातून 39 लाख रुपये जप्त करण्यात आले. यासोबत नोटा मोजण्याच्या मशिनसह चार आरोपींना अटक करण्यात आली. निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरातील पैठण गेट येथील एका मोबाइलच्या दुकानात 39 लाखांची रोकड जप्त केली. याप्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माइल, शेख रिझवान शेख शफिक या चौघांना अटक झाली. पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळाला. त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली

12 May 2024, 11:08 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : संभाजीनगरातील मोबाईलच्या दुकानातून 39 लाख रुपये जप्त

संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा मोबाईल दुकानातून 39 लाख रुपये जप्त करण्यात आले. यासोबत नोटा मोजण्याच्या मशिनसह चार आरोपींना अटक करण्यात आली. निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरातील पैठण गेट येथील एका मोबाइलच्या दुकानात 39 लाखांची रोकड जप्त केली. याप्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माइल, शेख रिझवान शेख शफिक या चौघांना अटक झाली. पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळाला. त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली

12 May 2024, 10:15 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : राहुल शेवाळे यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसोबत साधला संवाद

आज दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या मतदारसंघातील वडाळ्यातील फाईव्ह गार्डन या ठिकाणी मॉर्निंग करणाऱ्या लोकांसोबत साधला संवाद, 

निवडणूक जिंकल्यानंतर उरलेले पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लावणार, अस राहुल शेवाळे म्हणाले. 

तर उद्धव ठाकरे यांना माझ्या विरोधात प्रचारासाठी उतरावा लागतो, हेच माझ्या विजयाचे गणित आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.

निवडणुकीत फिट राहणं अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वत्र फिरुन प्रचार करत आहे. मोदींनी जो मूळ मंत्र दिलाय, फिट रहा; त्यानुसार सर्वत्र फिट राहण्याचा प्रयत्न करत आहे, असे राहुल शेवाळेंनी म्हटले.

12 May 2024, 10:14 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : पुणे लोकसभेसाठी मतदार संघनिहाय निवडणूक साहित्याचे वाटप सुरु

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून साहित्य वाटपाला सुरुवात
EVM मशीन सह इतर साहित्य मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत
निवडणूक प्रक्रियेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागणारे सर्व साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
उद्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडणार 
पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी सज्ज
एकूण 11 हजार 170 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे