Shubman Gill & Avesh Khan: टीम इंडियाचे लीग स्टेजमधील सामने संपले आहेत. कॅनडा विरूद्धच्या भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र लीग स्टेजमधील 3 सामने भारताने जिंकले असल्याने सुपर 8 मधील प्रवेश निश्चित आहे. अशातच मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेत सुपर 8 सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे रिझर्व्ह खेळाडू शुभमन गिल आणि आवेश खान यांना भारतात बोलावून घेतलंय. या दोन्ही खेळाडूंना अचानक भारतात का बोलावून घेतलं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण याच्या कारणाचा खुलासा आता झाला आहे.
आवेश खान आणि शुभमन गिल त्यांच्या भारतात परतण्याबाबत सतत तर्क-वितर्क लावले जात होते. शिस्तभंग केल्याप्रकरणातील कारवाईमुळे शुभमन गिलला अमेरिकेतून परतावे लागल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. याशिवाय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र आता यासंबंधी आता टीम इंडियाच्या कोचने मोठं विधान केलं आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही. पण जर या बातम्यांमध्ये तथ्य नसेल तर शुभमन गिल आणि आवेश खान यांना भारतात का पाठवलं हा प्रश्न उपस्थित होतोय. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये पुरेसे खेळाडू असल्याने शुभमन गिल आणि आवेश खान यांची गरज नाही. या खेळाडूंशिवाय राखीव खेळाडूही आहेत. त्यामुळे शुभमन गिल आणि आवेश खान भारतात परतलं पाठवल्याची माहिती आहे.
दरम्यान सोशल मीडियावर असा दावा करण्यात येतोय की, भारतात परत बोलावल्यामुळे गिलने रोहित शर्माला अनफॉलो केलं. पण आता या सर्व बातम्यांना पूर्णविराम देत भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दोन भारतीय खेळाडूंच्या मायदेशी परतण्याचा निर्णय स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना विक्रम राठोड म्हणाले, "सुरुवातीपासूनच आम्ही याबाबत विचार करत होतो. ज्यावेळी आम्ही अमेरिकेत येऊ तेव्हा चार खेळाडू सोबत येतील. त्यानंतर दोघे मायदेशी परततील आणि दोघे आमच्यासोबत वेस्ट इंडिजला जातील, त्यामुळे टीम निवडल्यापासून हीच योजना होती.
राठोड पुढे म्हणाले, "काही राखीव खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुकूल परिस्थिती नसतात सतत ही चिंता कायम असते यासंदर्भात काही शंकाच नाही. अशा परिस्थितीत खेळायचं की नाही हा निर्णय सामना अधिकाऱ्यांवर सोडला जातो. पण आम्हाला खरोखरच मदत झाली असती, आम्ही क्रिकेटचा चांगला खेळ खेळण्यास उत्सुक होतो.