Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

Loksabha Election 2024 Live Updates : मतदान केंद्रात मोबाईल आणू नका, निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी देशातील 10 राज्यांमधील 96 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद (संभाजीनगर), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. तर आध्रंप्रदेशमधील 25, बिहारमधील 5, छत्तीसगडमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, तेलंगणामधील 17, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालच्या 8 जागांचा समावेश आहे. तसेच चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 

12 May 2024, 08:56 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तातडीने नाशिक दौरा, व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये येत असून, ते विविध व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी सायंकाळी ६ वाजता पोलिस परेड ग्राऊंडने हेलिकॉप्टरने येतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता मनोहर गार्डन येथे शिक्षणसंस्था चालक, क्रीडा आणि अन्य संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वाजता बीएलव्हीडी येथे उद्योजकांशी ते संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत उद्योगमंत्री उदय सामंतदेखील येणार आहेत.

12 May 2024, 08:55 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : श्रीकांत शिंदेंसाठी आज राज ठाकरेंची कळव्यात सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कळव्यात आज संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे. कल्याणचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंसाठी कळव्यातील 90 फीट रोडवर राज ठाकरेंची सभा होणार आहे. सभेपूर्वी राज ठाकरे टेंभी नाका इथल्या आनंद आश्रमात जाणार जाऊन दिघेंना अभिवादन करणार आहेत...दिघेंच्या मृत्यूनंतर आणि सेना सोडल्यानंतर राज ठाकरे प्रथमच आनंद आश्रमात जाणार आहेत...

12 May 2024, 08:51 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : दिघेंच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा राज ठाकरे आनंद आश्रमात जाणार

राज ठाकरे आज ठाणे आणि कळव्यात, आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा राज ठाकरे आनंद आश्रमात जाणार, खारेगावात श्रीकांत शिंदेंसाठी घेणार सभा 

12 May 2024, 08:49 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : आज प्रचाराचा सुपर संडे

पाचव्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा सुपर संडे आहे. मुंबईत अनिल देसाईंसाठी चिता कॅम्पमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, तर शरद पवार, संजय राऊत, नाना पटोलेंची सभा भिवंडीतील मविआचे उमेदवार सुरेश म्हात्रेंसाठी होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आज मुंबईत ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. धुळ्यात शोभा बच्छाव यांच्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंची सभा होणार आहे. तर मुंबईत आदित्य ठाकरे, अनिल देशमुख संजय दिना पाटलांसाठी सभा घेणार आहेत. त्यासोबतच दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठीही फडणवीस, नार्वेकरांची सभा होणार आहे. 

12 May 2024, 08:47 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अनिल देसाईंसाठी उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा

मविआचे उमेदवार अनिल देसाईंसाठी उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा, तर संजय दिना पाटलांच्या प्रचाराला आदित्य ठाकरे, अनिल देशमुख उपस्थित राहणार

12 May 2024, 08:43 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान 

येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे यांसह मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबईतील उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. 

12 May 2024, 08:42 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडीत प्रचारसभांचा धडाडा

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात, येत्या 20 मे रोजी होणार मतदान, आज मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडीत प्रचारसभांचा धडाडा