Maharashtra Breaking News LIVE : जयंत पाटील यांची पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर

LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : जयंत पाटील यांची पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

24 Oct 2024, 12:07 वाजता

राष्ट्रवादी शदरचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन आज इंदापुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आहेत. ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं औक्षण केलं. 

24 Oct 2024, 11:59 वाजता

शरद पवार आव्हाडांच्या निवासस्थानी उपस्थित राहीले आहेत. ठाण्याचील निवासस्थानी शरद पवारांच्या उपस्थित सचिन आव्हांडांनी फॉर्म भरला आहे. 

24 Oct 2024, 11:49 वाजता

कल्याण पूर्वमध्ये भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. सुलभा गायकवाड थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विनोद तावडेंच्या उपस्थितीत भव्य रॅली होणार आहे.  महायुतीत बंडखोरी होणार नाही असं यावेळी विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. 

24 Oct 2024, 11:48 वाजता

समरजीत घाटगेंनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. कागल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. कागलमध्ये शक्तीप्रदर्शन करत घाटगेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

24 Oct 2024, 11:40 वाजता

अहिल्यानगरच्या राहुरी मतदार संघात भाजपकडून शिवाजीराव कर्डिले अर्ज भरणार आहेत.राहुरी येथे आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.12 वाजता ते अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतील. 

24 Oct 2024, 11:05 वाजता

पुण्यात दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा वृद्धांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी मतदारांना '12 ड' अर्ज भरून द्यावा लागणारेय. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत मतदारांना अर्ज भरून द्यावा लागणार आहे. 

24 Oct 2024, 11:03 वाजता

गुरू पुष्य योगाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात 600 रूपये प्रति तोळे तर चांदीच्या दरात अडीच हजार रुपये प्रतिकीलोची घट झाली आहे.  त्यामुळे आज सोन्याचे भाव GSTसह 80 हजार 500 प्रती तर चांदीचा दर GSTसह 1 लाख 1 हजार रुपये प्रतिकिलो एवढा झाला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

24 Oct 2024, 10:33 वाजता

जळगाव-एरंडोलमध्ये दीड कोटींची रोकड जप्त

नाकाबंदीवेळी पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव एरंडोलमध्ये दीड कोटींची रोकड जप्त करण्यात आलंय. एरंडोलच्या कासोदगावात नाकाबंदीवेळी कारमध्ये रोकड सापडली आहे. 

24 Oct 2024, 10:27 वाजता

समसमान जागांवर बोलणी पक्की - संजय राऊत 
कुणाला जागा द्यायची हा पत्राचा प्रश्न - संजय राऊत 
तिकीट नाकारणारे आरोप करतात - संजय राऊत 
आता फक्त जागांमध्ये अदलाबदल होऊ शकते 
आणखी 25 ओव्हर खेळणं बाकी आहे - संजय राऊत 

24 Oct 2024, 10:27 वाजता

आम्ही मेरिटवर निवडणूक लढवत आहोत ृ विजय वडेट्टीवार