Maharashtra Breaking News LIVE : जयंत पाटील यांची पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर

LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : जयंत पाटील यांची पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

24 Oct 2024, 10:25 वाजता

निलेश राणे 52000 मतांनी जिंकणार - एकनाथ शिंदे 

24 Oct 2024, 10:15 वाजता

ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.. मनसे नेते अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज भऱणार आहे.. त्यासाठी राज ठाकरे ठाण्यात उपस्थित राहणार आहे.. यावेळी मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.. तर दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड हे सुद्धा आज कळवा मुंब्रा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. यावेळी शरद पवार ठाण्यात येणार आहेत.. कळवा रेती बंदर येथे पवारंवर JCB मधून पुष्पवृष्टी करण्यात येईल. तसंच मुंब्रा येथील दत्तवाडी परिसरातून बाईक रॅली काढत जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज दाखल करतील.. 

24 Oct 2024, 09:19 वाजता

पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळली असून या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भोसरी येथील सद्गुरु नगरमधील घटना आहे. 

24 Oct 2024, 08:57 वाजता

भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट झाली आहे. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पण या भेटीचं कारण गुलदस्त्यात. ही चर्चा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा रंगली आहे. 

24 Oct 2024, 08:32 वाजता

रायगड जिल्हयातील उरणच्या जागेवरून शेकाप आणि शिवसेना ठाकरे पक्षाचं घोडं अडलं आहे. उरणसाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने प्रीतम म्‍हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर  ठाकरे पक्षाने माजी आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उरणसाठी रस्सीखेच सुरू आहे. 

24 Oct 2024, 08:31 वाजता

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत इच्छूक उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. यावेळी विधासभेसाठी जरांगे कोणाला उमेदवारी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

24 Oct 2024, 08:26 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फडणवीसांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. 

24 Oct 2024, 08:23 वाजता

मुख्यमंत्री शिंदे 24 तारखेऐवजी 28 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 24 तारखेला अनेक उमेदवारांचे फॉर्म भरणार असल्याने शिंदे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहणार आहेत. यामुळे अर्ज भरण्याची तारीख बदलण्यात आली.

24 Oct 2024, 08:21 वाजता

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान 'आता पुन्हा संधी मिळाली आहे. त्यामुळे 2019 चा बदला 2024 मध्ये घेतला जाईल अशी प्रतिकिया सुभाष भोईर यांनी दिलीय आहे. 

24 Oct 2024, 08:13 वाजता

मनसेचे अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणारेत. त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही असणारेत. अविनाश जाधवांना ठाणे शहरातून उमेदवारी देण्यात आलीये.