Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.
31 Oct 2024, 19:50 वाजता
कानपूरमध्ये सिलेंडरच्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू
कानपूरमध्ये गुरुवारी सिलेंडरचा स्फोट झाला असून या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरात झालेल्या या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच आजूबाजूच्या घरांचे आणि वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.
31 Oct 2024, 18:53 वाजता
कर्ज देत नसल्याच्या कारणावरून बँक मॅनेजरवर कोयत्याने वार
सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या कराड शाखेत बँक मॅनेजर आशिष कश्यप यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नाही, याचा राग मनात धरून जिवंत ठेवणार नाही असे म्हणत रेठरे बुद्रुक येथील आशुतोष सातपुते याने कश्यप यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात बँक मॅनेजर कश्यप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कराडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
31 Oct 2024, 16:59 वाजता
3 तारखेला मनोज जरांगे पाटील त्यांचे उमेदवार आणि मतदार संघांची घोषणा करणार
3 तारखेला आमचे उमेदवार कोणत्या मतदार संघात लढणार ते मतदार संघ आणि उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी झी 24 तास ला दिली. मराठा मुस्लिम आणि दलित समिकरण आता जुळलं आहे त्यामुळे आता आमचे उमेदवार निवडून येणार असून दलित मराठा आणि मुस्लीमांनी एकशिक्का मतदान करावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.
31 Oct 2024, 15:11 वाजता
चिंचवडमध्ये बंडखोरी, अजित पवारांकडून मनधरणीचे प्रयत्न
चिंचवड विधानसभेतील बंडखोर उमेदवार नाना काटे आणि अजित पवार यांची भेट झाली. अजित पवार यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप उमेदवार आहेत. नाना काटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
31 Oct 2024, 12:45 वाजता
शिवसेनेत इनकमिंग सुरूच, काँग्रेसच्या जयश्री जाधव एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करणार प्रवेश
कोल्हापूर - विद्यमान कांग्रेस आमदार जयश्री जाधव या थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ठाणे निवासस्थानी पक्षात प्रवेश करणार आहेत. कांग्रेस पक्षाला कोल्हापूरात मोठा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तर मधून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून चंद्रकांत जाधव हे आमदार झाले होते. 2021 यावर्षी चंद्रकांत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 2022 साली लागलेल्या पोट निवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. जयश्री जाधव यांनी पुन्हा कोल्हापूर उत्तर मतदार संघावर आपला दावा सांगितला होता. मात्र काँग्रेसने उमेदवार बदलत मधुरीमा राजे यांना उमेदवारी दिली त्यामुळे जयश्री जाधव या नाराज झाल्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
31 Oct 2024, 12:25 वाजता
प्रकाश आंबेडकर छातीत दुखायला लागल्यामुळे रुग्णालयात दाखल
प्रकाश आंबेडकर यांना पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत ब्लड कॉट आढळल्यामुळे त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आहे. पुढील काही तासात अँजियोग्राफी होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
31 Oct 2024, 11:54 वाजता
रवी राजांचा भाजपात प्रवेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रवी राजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रवी राजा यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे राजीनामा दिल्याचा म्हटलं आहे.
31 Oct 2024, 11:41 वाजता
पुण्यातल्या 648 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 21 मतदारसंघांसाठी 757 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत 109 अर्ज बाद झाल आहेत.
31 Oct 2024, 11:26 वाजता
पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 35 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 2023 साली राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. अजित पवारांसोबत 41 आमदार गेले आहेत. त्यानंतर 2024 साली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणुकीत होत आहे. त्यामुळे जनता शरद पवार की अजित पवारांना पसंदी देतात हे पाहवं लागणार आहे.
31 Oct 2024, 11:24 वाजता
पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 35 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. 2023 साली राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. अजित पवारांसोबत 41 आमदार गेलेत. त्यानंतर 2024 साली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच विधानसभा निवडणुकीत होत आहे. त्यामुळे जनता शरद पवार की अजित पवारांना पसंदी देतात हे पाहवं लागणार आहे.