Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.
31 Oct 2024, 09:32 वाजता
- वर्षावर रात्री उशिरा शिंदे-फडणवीसांची खलबतं
- बंडखोरी थांबवण्यासंदर्भात चार तास चर्चा
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वत: बंडखोरांशी चर्चा करण्याची शक्यता
- सदा सरवणकरांसंदर्भातही बैठकीत चर्चा
31 Oct 2024, 09:31 वाजता
सामूहिक बलात्काराने अमरावती हादरलं आहे. दारू पाजून मुलीवर सामूहिक अत्याचार केला आहे. पोलिसांकडून पाच आरोपींना बेड्या घालण्यात आलं आहे.
31 Oct 2024, 08:22 वाजता
भांडूपमध्ये आज संजय राऊतांची पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आल आहे. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
31 Oct 2024, 08:21 वाजता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी 11.30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
31 Oct 2024, 08:16 वाजता
तयार फराळाच्या दरात 70% वाढ
तयार फराळाच्या मागणीत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुट्टी नसल्यामुळे बहुतांश महिलांनी घरी फराळ करण्याऐवजी तयार फराळ घेण्यास पसंती दर्शवली आहे. यामुळे यंदा महिला बचत गट आणि गृहउद्योगांकडे फराळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याच वेळी महागाईमुळे फराळांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत.