Maharashtra Monsoon Session 2023 Live: बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, विधानभवनात चर्चा

Maharashtra Monsoon Session 2023 Live: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session 2023 Live: बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, विधानभवनात चर्चा

Maharashtra Monsoon Session 2023 Live: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज तिसरा दिवस आहे. आज पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बी बियाणे, महिलांवरील अत्याचार या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवरुनही गदारोळाची शक्यता आहे. 

 

19 Jul 2023, 17:14 वाजता

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान अंबरनाथ लोकल थांबली असताना एक महिला लहान बाळासोबत खाली उतरली. पण नाल्यात चार महिन्याचं बाळ वाहून गेल्याची दुर्घटना घडली. आताच मिळालेल्या माहितीनुसार एनडीआएफ जवानाने या बाळाला वाचवलं. 

बातमी सविस्तर वाचा - मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

19 Jul 2023, 15:17 वाजता

राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले "सत्तेची साठमारी..."

 

Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज विधानभवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. विधानभवनातील केबिनमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरेही यावेळी त्यांच्यासोबत होते. दरम्यान भेटीदरम्यान आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवरही भाष्य केलं.

बातमीची लिंक - https://zeenews.india.com/marathi/maharashtra/shivsena-uddhav-thackeray-meets-ajit-pawar-maharashtra-assembly-monsoon-session/730319

 

19 Jul 2023, 14:09 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे पोहोचले होते. राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच ही भेट झाली. विधानभवनातील केबिनमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरेही सोबत होते. 

19 Jul 2023, 14:07 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live:  ''शासन आपल्या दारी'' या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची राज्य सरकारची कबुली. 
''शासन आपल्या दारी'' उपक्रमाच्या अनुषंगाने शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी 52 कोटी 90 लाख 80 हजार इतक्या खर्चास सरकारने मान्यता दिली आहे. विधानपरिषदेत सरकारची माहिती

यापूर्वी विरोधकांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप केला होता.

19 Jul 2023, 13:30 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: "मी वंदे मातरम म्हणणार नाही", अबू आझमी यांचं विधान, भाजपा आमदार आक्रमक

'इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा' असं म्हटलं होतं. मात्र आम्ही ते म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाला मानतो. त्यामुळे आणखी कोणापुढे आम्ही माथा टेकवू शकत नाही असं अबू आझमी म्हणाले आहेत. भाजपचे आमदार आक्रमक वेलमध्ये उतरून अबू आझमी  यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. 

19 Jul 2023, 13:15 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: विधानसभा 10 मिनिटांसाठी तहकूब

19 Jul 2023, 12:47 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय

न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने ज्येष्ठ विधीतज्ञांची एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. क्युरेटिव्ह याचिका फेटाळली तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी एक समर्पित मागासवर्ग आयोग नेमला जाईल. राज्य सरकारने दिले अधिवेशनात छापिल उत्तर दिलं आहे. 

19 Jul 2023, 11:49 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: धनंजय मुंडे यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग

19 Jul 2023, 11:32 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी; बाळासाहेब थोरांतानी आरोप केला. यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारने खतांचे भाव वाढवलेले नाहीत अशी माहिती दिली. 

19 Jul 2023, 11:22 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: किरीट सोमय्या यांच्याविरोधातील आणखी पुरावे  यथावकाश बाहेर काढले जातील. आणखी काही पेनड्राईव्ह आपल्याकडे आहेत त्यांचे, तेही लवकरच बाहेर काढू. नैतिकतेच्या गप्पा मारणा-या भाजपने अद्याप सोमय्यांवर निलंबनाची कारवाई केलेली नाही. कारवाई व्हायला हवी असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.