Maharashtra Monsoon Session 2023 Live: बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, विधानभवनात चर्चा

Maharashtra Monsoon Session 2023 Live: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session 2023 Live: बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, विधानभवनात चर्चा

Maharashtra Monsoon Session 2023 Live: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज तिसरा दिवस आहे. आज पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बी बियाणे, महिलांवरील अत्याचार या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवरुनही गदारोळाची शक्यता आहे. 

 

19 Jul 2023, 11:21 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: पूरस्थितीमध्ये लोकांना सतर्क करण्याचा सूचना देण्यात येत आहेत. 24 तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचं पूरस्थितीमध्ये नुकसान होईल त्यांना मदत दिली जाणार आहे. भाजप हिंदुस्थान भारतासोबत आहे, विरोधक इंडियासोबत आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत गरीब जनतेसोबत आहोत  अजित पवार तुमच्यासोबत होते तेव्हा तुम्हीच त्यांना क्लीन चिट दिली. उद्धव ठाकरे हे संधीसाधू आहेत, सत्याच्या बाजूने नाहीत हे संजय राऊत समजून घ्या असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. 

 

19 Jul 2023, 11:16 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: विधीमंडळाच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी, 'महिला विरोधी कलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार' असे बॅनर घेऊन घोषणा

19 Jul 2023, 11:04 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीमध्ये प्रामुख्याने महिला प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाला घेरण्याची रणनीती आखण्यात आली. बैठकीसाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड, सेनेकडून सचिन अहिर, अंबादास दानवे उपस्थित होते.

19 Jul 2023, 10:57 वाजता

Maharashtra Monsoon Session 2023 Live: आज अधिवेशनात या मुद्दयांवर होणार चर्चा

1) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता 

2) बी बियाणे आणि खते किमती वाढ यावर चर्चा होणार

3) राज्यातील महिला-मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात वाढ (महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर)

4) औरंगाबाद दंगल प्रकरण

5) शिवशाही बसला अचानक लागणाऱ्या आगी ( विधान परिषद)

6) सातारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी सभागृहात आज गोंधळ होऊ शकतो (विधान परिषद )