Maratha Reservation Live : आताची मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर

Maharashtra Special Assembly Session Live Updates: मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि सगेसोयरे असा उल्लेख या सर्व विषयांवर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे.   

Maratha Reservation Live : आताची मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर

Maharashtra Vidhi Mandal Adhiveshan LIVE Updates: विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असून, या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या विशेष अधिवेशनाआधीच मंगळवारी सकाळी मनोज जरांगे यांनी माध्यमांना संबोधित करत काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या. 

(Manoj Jarange) जरांगे नेमकं काय म्हणाले? अधिवेशनात नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार? 10 टक्के आरक्षण देत असताना कोणत्या तरतुदी केल्या जाणार हे येत्या काळात कळणार असून सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी कोणती ठाम भूमिका मांडली जाते यावरही सर्वांचं लक्ष असणार आहे. 

20 Feb 2024, 08:36 वाजता

Maratha Reservation Special Assembly Session Live : दोन्ही सभागृहांत एकाच वेळी चर्चा?

सर्वसाधारणपणे विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते विधान परिषदेत मांडलं जातं. किंबहुना कोणत्याही विधेयकावर भूमिका मांडण्याचा विधिमंडळ सदस्यांचा अधिकार आहे. त्यामुळे विधानसभेत सर्वपक्षीय मोजक्या नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली, तरी काही तासांच्याच चर्चेनंतर विधेयक मंजूर होईल. तोपर्यंत विधान परिषदेतही विधेयक मांडून चर्चा सुरू करायची का, याबाबतचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या वतीनं घेतला जाणार आहे. 

 

20 Feb 2024, 07:54 वाजता

Maratha Reservation Special Assembly Session Live : ...म्हणून अधिवेशनाची तारांबळ 

मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे साधारण आठवड्याभरापासून उपोषण करत आपल्या मागण्या उचलून धरताना दिसत असल्यामुळं विधिमंडळाचं नियोजित अधिवेशन 26 ऐवजी 20 फेब्रुवारीलाच बोलवण्यात आलं. 

 

20 Feb 2024, 07:48 वाजता

Maratha Reservation Special Assembly Session Live : राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सुरु होणार अधिवेशनाचं कामकाज

2024 या वर्षातील हे पहिलंच अधिवेशन असल्यामुळं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरु होईल. राज्यपालांच्या अभिभाषणाची वेळ सकाळी 11 वाजताची असून दुपारी बारा वाजेपर्यंत अभिभाषण पूर्ण झाल्यानंतर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका होणार असून त्यात दिवसभराच्या कामकाजाचं स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, विधानसभेचं कामकाज दुपारी 1 वाजता, तर विधान परिषदेचं कामकाज दुपारी 2 वाजता सुरू होईल.

20 Feb 2024, 07:40 वाजता

Maratha Reservation Special Assembly Session Live : विशेष अधिवेशनापूर्वी काय म्हणाले मनोज जरांगे? 

'या विशेष अधिवेशनात सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी, नंतर मागासवर्ग आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा', अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. सगेसोयरे हा विषय सर्वात आघी घेत त्यांची अंमलबजावणी करावी आणि मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा, ओबीसीतून आरक्षणाची मागणीही उचलून धरावी असा विनंतीपर सूर त्यांनी आळवला. 

 

20 Feb 2024, 07:39 वाजता

Maratha Reservation Special Assembly Session Live : मुख्यमंत्र्यांचं आश्वासन 

मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढत असताना ओबीसीच नव्हे, तर इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिनजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावरून दिली. दरम्यान, मराठा समाजाची लोकसंख्या 27  टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणानंतर देण्यात आला आहे. आता त्याच आधारे स्वतंत्र संवर्गातून समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे.