गडगंज श्रीमंत असणाऱ्या अंबानी कुटुंबाला हिरा नाही तर आवडतं 'हे' रत्न, 500 कोटींचा नीता अंबानी यांचा नेक्लेस

Nita Ambani : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडिंगची लगबग सुरु आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा अंबानी कुटुंबीय चर्चेत आले आहेत. अंबानी कुटुंबाच्या आवडीच्या कलेक्शनमध्ये एक खास दागिना आहे. तो कोणता जाणून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 28, 2024, 01:10 PM IST
गडगंज श्रीमंत असणाऱ्या अंबानी कुटुंबाला हिरा नाही तर आवडतं 'हे' रत्न, 500 कोटींचा नीता अंबानी यांचा नेक्लेस  title=

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचा 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत विवाह पार पडणार आहे. या अगोदर यांचं प्री वेडिंग होत आहे. मार्च महिन्यात गुजरात येथील जामनगर येथे पहिलं प्री वेडिंग पार पडलं. यानंतर दुसरं प्री वेडिंग हे क्रूझवर पार पडणार आहे. यामध्ये 800 पाहुण्यांचा समावेश आहे. 

अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीच खास असतात. मग ते डिझाइनर कपडे असोत किंवा ज्वेलरी असो. अंबानी कुटूंबातील महिला या हिरे नाही तर या 'धातू' च्या खास प्रेमात आहेत. अंबानी कुटुंबातील स्त्रियांच्या दागिन्यांची जोरदार चर्चा होते. अनेकदा नीता अंबानी आपल्या सुनांवर देखील भारी पडतात. 

नीता अंबानी यांची ज्वेलरी 

नीता अंबानी यांच ज्वेलरी कलेक्शन पाहता त्यांचा एमराल्ड प्रति असलेलं प्रेम अतिशय स्पष्टपणे दिसतात. अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगच्या प्रोगाममध्ये कांतिलाल छोटेलालद्वारे डिझाइन केलेलं कोलंबियाई एमरॉल्ड म्हणजे पाचू परीधान केलं. रिपोर्टनुसार, या ज्वेलरीची किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे. 

ईशाला देखील पाचूची भुरळ 

ईशा देखील आईच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. ईशा देखील अनेकदा पन्ना कॅरी करताना दिसते. मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या एका गोल्डन ड्रेसमध्ये ही ज्वेलरी कॅरी केली होती. ईशाने देखील आपलं वेगळेपण जपलं आहे. पाचू रत्नाचे फायदे देखील असंख्य आहेत. 

पाचू धातूचं वेगळेपणं काय?

पाचू एक कठीण रत्न आहे. हे बायरल कुटुंबातील आहे. त्याचा हिरवा रंग ही त्याची खासियत आहे. असे मानले जाते की, ख्रिस्ताच्या जन्माच्या 330 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये पाचू प्रथम काढला गेला होता. सौंदर्याचा समानार्थी मानली जाणारी इजिप्शियन राणी क्लियोपात्रा हिच्याकडे 'पाचू'पासून बनवलेला भव्य संग्रह होता.

पाचू रत्नाचे फायदे 

ज्योतिष शास्त्रानुसार पाचू धारण केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत होतो. बुधाच्या बलामुळे व्यक्तीला यश मिळते. तो कोणत्याही क्षेत्रात कठोर परिश्रम करून यश मिळवतो. अशा लोकांसाठी प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात. बुध ग्रहाच्या बलामुळे व्यक्ती हुशारीने निर्णय घेते. याशिवाय व्यक्तीची कल्पनाशक्तीही चांगली असते.

पाचू धारण केल्याने होणारे आर्थिक फायदे ज्योतिषशास्त्रातही सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाचू धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. उत्पन्नही चांगले राहते. याशिवाय माणसाच्या जीवनात सुख-शांती नांदते.