Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Maharashtra Rain LIVE Updates:..तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधातही लढेन- राज ठाकरेंच्या शिलेदाराचा हुंकार 

Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Maharashtra Rain Live Updates:  महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी शहरात शिरण्याची शक्यता

25 Jul 2024, 12:40 वाजता

मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले 

रायगडच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. 6 गेट मधून प्रती सेकंद 3.35 घन मीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

25 Jul 2024, 12:37 वाजता

राधानगरी धरण 100 टक्के भरलं, 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू..

एकीकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असतानाच राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. सद्या धरण 100 टक्के भरले असून धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा सकाळी 10 वाजता उघडला आहे. या धरणातून प्रति सेकंद 3000 इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.

25 Jul 2024, 12:24 वाजता

उजनीत भीमा नदीतून विसर्ग सुरू, धरण रात्रीपर्यंत मायनसमधून येणार प्लसमध्ये

भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून इतर धरणं देखील जवळपास भरली आहेत. या धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने आता दिलेल्या आकडेवारीनुसार बंडगार्डन मधून एक लाख 5538 क्यसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.आज रात्री 10 वाजेपर्यंत अवघ्या काही तासात दौंड मधुन भीमा नदी पात्रात एक लाख हुन अधिकचा विसर्ग होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

25 Jul 2024, 12:22 वाजता

मंत्रालयातून राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार पुण्याकडे रवाना

मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.

25 Jul 2024, 12:21 वाजता

वर्ध्यात पावसामुळे सिमेंटचा स्लॅब खचला

वर्ध्यात मुळसधार पावसाने चांगलाच कहर केला आहेय..वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक पूल व विहिरी खचल्या आहेय..अश्यातच वर्धा शहरातील प्रभाग क्रमांक 18 मॉडेल हायस्कूल तारफैल येथील सिमेंटचा स्लॅब खचला यांच्यात कोणतेही जीवितहानी झाली नाही..मात्र हे घर नागरपालिकेकडून घरकुल योजनेत 2010 मध्ये बांधले असल्याची माहिती देण्यात आली.

25 Jul 2024, 12:13 वाजता

मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास 

जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून राष्ट्रीय महामार्ग जात आहे मात्र या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे झाल्याचे पाहायला मिळत आहे मुंबई ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा खड्डेमय झाल्याचे पाहायला मिळत असून पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज नाल्याने महामार्गावर अपघात झाल्याचे देखील घटना समोर आलेले आहेत जळगाव शहरातील आकाशवाणी चौक इच्छादेवी चौक या महत्त्वाच्या चौकांमधून मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिकांची वाहतूक सुरू असते त्याच ठिकाणी मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोज नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे माहिती समोर आली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर भरून देखील चांगल्या सुविधा मिळत नसतील तर काय फायदा असा संतप्त सवाल विचारला जातोय. 

25 Jul 2024, 11:51 वाजता

मावळ आणि मुळशीतील पर्यटन स्थळांवर 4 दिवस बंदी असणार आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

25 Jul 2024, 10:42 वाजता

जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी निधन !

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक व विचारवंत,तथा हरित वसईचे प्रणेते वसई धर्मप्रांता तले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी गुरुवार 25 जुलै 2024 पहाटे 6 वाजता निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज गुरुवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) त्यानंतर 4 वाजेपासून पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे अंत्यदर्शन घेता येईल. तर त्यांचा अंत्यविधी मिस्सा - विधी गुरुवार 25 जुलै 2024 रोजी, संध्याकाळी 6 वाजता पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे होईल.अशी माहिती बिशप हाऊस वसईचे फादर बर्नाड फर्नांडिस यांनी दिली. फादर दिब्रिटो यांच्या निधनाने एकूणच साहित्य जगतावर शोककळा पसरली आहे

25 Jul 2024, 10:22 वाजता

उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन 

मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे. नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

25 Jul 2024, 09:07 वाजता

रायगड ताम्हिणी घाटात कोसळली दरड, एकाचा मृत्यू

माणगाव पुणे रस्त्यालगत असलेल्या धाब्यावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरड बाजूला करण्यास आणखी 4 ते 5 तास लागणार आहेत. दरम्यान माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ताम्हिणी घाटात आधारवाडी गावाजवळ ही दरड कोसळली.