ग्रहण योगासोबतच आज धन योग, कोणत्या राशीला होणार फायदा आणि कुणाला नुकसान?

Horoscope Today : 18 सप्टेंबर रोजी बुधवारी चंद्र मीन राशीत प्रवेश करेत. तर गोचर दरम्यान चंद्र पूर्वाभाद्रपद उत्तराभाद्रपद नक्षत्रात करेल संचार. कसं असेल 12 राशींचं भविष्य. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 18, 2024, 07:17 AM IST
ग्रहण योगासोबतच आज धन योग, कोणत्या राशीला होणार फायदा आणि कुणाला नुकसान? title=

राशीभविष्य बुधवार, 18 सप्टेंबर ग्रह संक्रमणानुसार वृषभ, मिथुन आणि मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. यामुळे आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल ते पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

मेष 
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय खर्चिक असेल. वडिलांच्या तब्बेतीबाबत शंका निर्माण होऊ शकते. आज मेष राशींसाठी मानसिक कष्टाचा दिवस असेल. सल्ला हा आहे की, आजचा दिवस अतिशय समजूतदारपणे घालवा. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ 
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य पद्धतीने चांगला असेल. दिवसाच्या सुरुवातीलाच आज तुम्हाला कुटुंबातील व्यक्तीच्या व्यवहारामुळे मानसिक ताण जाणवेल. खर्चाला आवर घाला कंट्रोल करणे महत्त्वाचे आहे. लवलाइफमध्ये आज ताळमेळ घधालणे गरजेचे ठरेल. दुपारी आकस्मित लाभ होईल. 

मिथुन 
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. आजचा दिवस तपमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरदार वर्गाने काळजी घ्यावी. व्यावसायिक क्षेत्रात चांगली कमाई होईल. कामानिमित्त प्रवास दौरे होतील. परदेशी जाणाऱ्या लोकांनी आज विशेष प्रयत्न करावेत. 

कर्क 
कर्क राशीच्या लोकांनी आज तब्बेतीची काळजी घ्यावी. मानसिक ताण आणि तणावात आजचा दिवस जाणार आहे. आज संयमाने काम करता. भावंडांशी व्यवहार मानसिक कष्टाचा असेल. आजचा सल्ला असा असेल की, कानाने हलके राहू नये. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. 

सिंह 
सिंह राशींसाठी आजचे ग्रह महत्त्वाचे आहेत. समाजात तुमच्या प्रभाव असेल तुमच्या कृतीने सन्मान वाढेल. आरोग्याबाबत थोडे सतर्क राहा कारण आजचा दिवस अथिशय महत्त्वाचा आहे. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल, सासरच्या मंडळींकडून आज प्रेम आणि सन्मान मिळेल. 

कन्या 
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सामान्य असेल. आरोग्याची काळजी घ्या. सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार डोकं वर करतील. आज चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून घेण्याचा विचार मनात येईल. पण संयम बाळगा. वाहन चालवताना काळजी घ्या. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल. 

तूळ 
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असेल. कुणाच्यातरी चुकीचा फटका तुम्हाला बसेल. विरोधक आणि शत्रुंपासून सतर्क राहा. कौटुंबिक गोष्टींमध्ये आज खर्च होईल. आर्थिक बाबींमध्ये ग्रह सांगतात की, अनेक दिवसांपासून अडकलेले धन आज मिळेल. 

वृश्चिक 
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. रखडलेलं काम आज पूर्णत्वाला जाईल. मित्रांकडून आज अपेक्षित मदत मिळेल. लव लाइफचा विचार केला तर प्रिय व्यक्तीसोबत आज संवाद अतिशय सुंदर असेल. 

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. दिवसाचा दुसरा भाग अतिशय महत्त्वाचा असेल. भौतिक सुख सुविधांनी आजचा दिवस समृद्ध अशेल. दान धर्म करण्याचा विचार नक्की करा. वैवाहिक जीवनात अतिशय आनंद असेल. कामानिमित्त आज प्रवास होऊ शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरेल. 

मकर 
मकर राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कामाकडे लक्ष द्या. तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. बदलत्या वातावरणामुळे आज सर्दी खोकलाचा त्रास होऊ शकतो. धार्मिक कामात मन लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 

कुंभ 
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय व्यस्ततेचा असेल. दिवसाची सुरुवातच अगदी अनपेक्षित प्रवासाने होईल. कामात यश मिळेल. घरातील कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. कमाई चांगलीच होईल पण खर्च देखील तेवढाच वाढेल. 

मीन 
मीन राशीचे ग्रह सांगतात की, आजचा दिवस शुभ असेल. कौटुंबिक जीवनात आत सुख आणि समाधान मिळेल. भावंडांसोबत आजचा दिवस घालवाल. आप्तेष्ट आणि स्नेही भेटतील. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. दुपारनंतर थोडा आराम मिळेल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)