मुलांच्या इंस्टांग्रामवर आता पालक ठेवणार नजर, Meta Instagram चा नवीन नियम

हल्ली मोबाईल आणि सोशल मीडिया यामध्येच मुलं गुंतलेली असतात. अशावेळी पालकांना नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. पण आता Meta Instagram ने यावर चांगलाच मार्ग काढला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 18, 2024, 11:21 AM IST
मुलांच्या इंस्टांग्रामवर आता पालक ठेवणार नजर, Meta Instagram चा नवीन नियम  title=

Instagram New Policy for Children: Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगभरातील लाखो लोक वापरतात. याचा वापर फोटो, व्हिडीओ आणि रील्स पोस्ट करण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. केवळ प्रौढच नाही तर मुलेही या प्लॅटफॉर्मचा भरपूर वापर करतात. दरम्यान, मेटाने इन्स्टाग्रामवरील 18 वर्षांखालील मुलांच्या अकाऊंटची प्रायव्हसी आणि पालकांच्या नियंत्रणासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या बदलामुळे सोशल मीडियाची नकारात्मक बाजूची चिंता दूर करण्यासाठी करण्यात आला आहे.

मेटाने दिलेल्या अहवालानुसाप, Instagram आता "Teen Accounts" मध्ये बदल केले आहे. जे डिफॉल्टमधून प्रायव्हेट अकाऊंट झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या अकाऊंट्सच्या युझर्सना फक्त त्याच अकाऊंट्सला मॅसेज किंवा टॅग केलं जाऊ शकतं ज्यांना ते फॉलो करतात. किंवा आधीपासून त्यांना फॉलो करत आहेत. तसेच सेंसिटिव कंटेंट सेटिंग्सला रिस्ट्रिक्टिव सेटिंवर सेट करु शकता. 

पालक करणार नियंत्रण 

16 वर्षांखालील युझर्स केवळ पालकांच्या परवानगीने डीफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकतात. सेटिंग्जचा एक सेट देखील मिळेल जेणेकरून ते पाहू शकतील की, त्यांची मुले कोणाशी बोलतात. एवढंच नव्हे तर ते Instagram वर किती वेळ घालवत आहेत. मेटामधील हा बदल मुलांना इंस्टाग्राम योग्य प्रकारे पद्धतीने वापरण्यास मदत करू शकतो.

मेटा, टिकटॉक आणि यूट्यूबवर गुन्हे दाखल

 सोशल मीडियाच्या व्यसनाधीनचे प्रमाण इतके वाढले आहे की, शाळेतील मुलं देखील यामध्ये अ़कले आहेत. एवढंच नव्हे तर शाळेतील जिल्ह्यांच्या वतीने Meta, ByteDance च्या TikTok आणि Google च्या YouTube वर यापूर्वीच अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी, 33 अमेरिकन राज्यांनी कंपनीच्या प्लॅटफॉर्मच्या धोक्यांबद्दल लोकांची दिशाभूल केल्याबद्दल कंपनीवर खटला दाखल केला.