Maharashtra Breaking News LIVE Update : सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर

Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.   

Maharashtra Breaking News LIVE Update : सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर

Maharashtra Breaking News LIVE Update : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. विधानसभा लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार. महायुती आणि मविआतील बंडखोर अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष.  जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर. 

4 Nov 2024, 09:49 वाजता

सांगलीतील तासगावमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर 

सांगलीतील तासगावमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर आलाय. दिवाळी निमित्त घराघरांत मिठाई आणि तीन हजार रुपयांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयकाका पाटील समर्थकांनी पैसे वाटणा-या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात दिलंय़. तर आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचं रोहित पाटलांनी म्हटलंय. 

 

4 Nov 2024, 09:48 वाजता

अमित ठाकरे उद्या पासून प्रचाराला सुरवात करणार

मुंबईतील माहिम विधानसभेचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे उद्या पासून प्रचाराला सुरवात करणार आहेत. संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत एकनाथबुवा हातिसकर मार्गावरून प्रचाराची सुरुवात होणार आहे. 

 

4 Nov 2024, 09:06 वाजता

भंडारा जिल्ह्यातील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधुक वाढली

भंडारा जिल्ह्यातील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधुक वाढलीय. भंडा-यातून काँग्रेस नेत्या पूजा ठवकर यांनी अर्ज दाखल केलाय. तर त्यांच्याविरोधत शिवसेना बाळासाहेब ठाकेर पक्षाचे नेते नरेंद्र पहाडे यांनीही अर्ज दाखल केलाय. साकोलीतून भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली. मात्र त्यांच्याविरोधात सिमदत्त करंजेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तुमसरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी आमदार चरण वाघमारेंना पक्षप्रवेश देत उमेदवारी दिली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत. कार्यकर्त्यांनी तिसरी आघाडी करत मधुकर कुकडे यांना मैदानात उतरवले आहे. 

4 Nov 2024, 09:01 वाजता

मनोज जरांगे आज उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार 

मनोज जरांगे थोड्याच वेळात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहे. राज्यात 15 ते 20 ठिकाणी जरांगे उमेदवार घोषित करणार आहे. ज्या ठिकाणी उमेदवार घोषित केले जाणार त्यांनाच पाठिंबा मिळणार असल्याचं त्यांनी कालच जाहीर केलंय. त्यामुळे इतर  उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलंय. त्यामुळे कोणत्या 15 ते 20 जागा जरागें लढणार हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. ज्या ठिकाणी जरांगे उमेदवार उभे करणार नाही त्या ठिकाणावरील उमेदवार  पाडायचे असल्याचं जरांगे म्हणालेत.

4 Nov 2024, 08:51 वाजता

Pune News : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या कमल व्यवहारे नॉट रिचेबल 

काँग्रेसच्या बंडखोर नेत्या कमल व्यवहारे कालपासून नॉट रिचेबल आहेत. कमल व्यवहारे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार आहेत. मात्र, कालपासून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंकुश काकडे यांनी दोन दिवसांपूर्वी बंडखोरांच्या घरी जाऊन बैठका घेत आहेत. मात्र, कमल व्यवहारे नॉट रिचेबल आहेत. यामुळे काँग्रेसचं टेन्शन वाढलंय. 

4 Nov 2024, 08:47 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Update : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. महायुती, मविआमधील अनेक बंडखोरांकडून उमेदवार अर्ज दाखल. महायुती, मविआतील बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष. बंडखोर अर्ज मागे घेणार की लढणार? याकडे लक्ष. विधानसभा लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.