Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील 'या' शाळांना सुट्टी जाहीर

राज्यभरातील महत्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील 'या' शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Breaking News LIVE: राज्यभरातील महत्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घेऊया.

21 Jul 2024, 21:18 वाजता

महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना उद्या सोमवार 22 जुलै रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी असे आदेश दिले आहेत.

21 Jul 2024, 20:14 वाजता

जगबुडी नदीवरील पुलाची ऐक लेन बंद, दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरु

खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या जगबुडी नदीवरील पुलाची ऐक लेन बंद करण्यात आली असून दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. जगबुडी नदीवरील पुलाची पाहणी पोलिसांनी केली आहे. पाहणीनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ऐक लेन बंद केली आहे.

21 Jul 2024, 20:09 वाजता

मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक पुन्हा सुरळीत

अडीच तासानंतर पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.  मुसळधार पावसामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. सुरक्षितता म्हणून अंजणारी ब्रिजवरील वाहतूक काही वेळ थांबवलेली होती. 

21 Jul 2024, 18:52 वाजता

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन बनत नाही,  सुप्रिया सुळेंची  अमित शाह यांच्यावर टीका

अमित शाह गेली दहा वर्षे ज्या सरकारमध्ये आहेत, त्याच सरकारने शरद पवार यांचा पद्मविभूषण देऊन गौरव केलेला आहे. भाजपने प्रचाराचे आरोप करत त्यांना डर्टी डझन ठरवलं होतं. ते सगळे आज त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी कोण? असा प्रश्न विचारत त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

21 Jul 2024, 18:51 वाजता

डहाणूला पावसाने झोडपलं, नागरिकांची उडाली तारांबळ

पालघरमध्ये मुसळधार पावसाने डहाणूला झोडपलं. डहाणूच्या सागर नाका आणि इराणी रोड परिसरात पाणीच पाणी साचलं . डहाणूत अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. डहाणूसह परिसरात अजूनही पावसाची संततधार सुरुच आहे.

21 Jul 2024, 17:36 वाजता

सावित्री नदीचे पाणी धोका पातळीवर, पालिकेकडून सतर्कतेचा इशारा

रायगडच्या महाडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या नदीचे पाणी धोका पातळीवर गेलं असून नगर पालिकेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफच्या पथकाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाबळेश्वर आणि घाट माथ्यावरील मुसळधार पावसाचा महाडला फटका बसला आहे. महाबळेश्वर इथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 145 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पोलादपूरमध्ये 102 तर महाडमध्ये 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

21 Jul 2024, 17:01 वाजता

 मुंबई गोवा महामार्ग ठप्प, अंजणारी ब्रिजवरील वाहतूक थांबवली

 रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिजवरील वाहतूक थांबवली आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षितता म्हणून वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिज  हा ब्रिटिश कालीन आहे.  

21 Jul 2024, 15:25 वाजता

धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 जण अडकले

नवी मुंबईतील बेलापूर येथील आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 जण अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमन दल, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सध्या रेस्क्यू ऑपेरेशन सुरु आहे. दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येतं आहे.

21 Jul 2024, 13:37 वाजता

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्या- देवेंद्र फडणवीस 

हे निवडून आले तर सविधन बदलणार आरक्षण बदलणार हे सांगण्यात आले... फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला.यांचा विजय फुग्यासारखा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी एक टाचणी लावली तर काय होते..याची सुरुवात विधान परिशदेत दिसली.विधान परिषद निवडणुकीत वीस आमदार आमच्याकडे आले हे सुध्दा तुम्हाला कळले नाही...हे सांगत होते की आमचे आमदार संपर्कात आहेत... फेक नरेटीव्ह करत होते.ही लोक लबाड आहेत. सभागृहात खोटी योजना आहे सांगतात आणि गावाकडे यांचेच पोस्टर लागले आहेत. ही योजना आपली आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितल पाहिजे. महाविकास आघाडीने एक स्टॅटर्जी ठरवली आहे. फॉर्म भरून घेत आहे आणि पुढे द्यायचे नाही...हे तुम्ही लोकांना सांगून द्या...ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चालला आहे. हे आपण होऊन द्यायच नाही.

21 Jul 2024, 12:21 वाजता

दोन्ही पवार एकत्र येण्यात काहींची आडकाठी - शेळके यांचा रोहित पवारांवर निशाणा

शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल मात्र काही नेत्यांना लवकर नेतृत्व करायचा आहे. त्यामुळे ते त्या दोघांना एकत्र येऊ देत नाहीत अशी टीका मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केलीय.