Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

aharashtra Breaking News Live Updates :  दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स  पाहा एका क्लिकवर.   

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून ते प्रत्येक शहरातील अपडेट्सचे सविस्तर वृत्त जाणून घ्या. 

 

 

4 Jan 2025, 21:25 वाजता

राज ठाकरेंनी मंगळवारी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक 

राज ठाकरे यांनी मुंबईतील विभाग अध्यक्षांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. यामध्ये मुंबईतील 36 विधानसभा मनसे अध्यक्ष बैठकीला उपस्थित असणार आहेत.  आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व. 

4 Jan 2025, 21:09 वाजता

कोकणातील निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी? 
 
राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. 
यावेळी राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं. तसंच उद्धव ठाकरेंकडे तक्रारींचा पाढा वाचल्याची सुत्रांची माहिती आहे. यावर उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच खडे बोल सुनावले आणि विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का असा उलट प्रश्नही विचारला. त्यावर विनायक राऊतांना 21 हजाराचा लीड दिल्याचं राजन साळवींनी स्पष्ट केलं, त्यामुळे मी जबाबदार कसा ? असा उलट प्रश्न साळवींनी केला. 

4 Jan 2025, 20:29 वाजता

समुद्रातील अनधिकृत बोटींवर कारवाईसाठी सरकार घेणार ड्रोनची मदत

समुद्रातील अनधिकृत बोटींवर कारवाईसाठी सरकार घेणार ड्रोनची मदत. खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार सरकारचे लक्ष. मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा महत्त्वाचा निर्णय. अनधिकृत मासेमारी व बोटींवर पुढील आठवड्यापासून सुरु होणार कारवाई.

4 Jan 2025, 19:28 वाजता

धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती

धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीच्या माणकोली नाक्याजवळील कार्यक्रमात गोंधळ उडालाय. भाविकांची गर्दी वाढल्यानं कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. गोंधळ झाल्यानं धीरेंद्र शास्त्री यांनी स्टेजवरून निघून गेल्याचं दिसून येतंय. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचंही पाहायला मिळालंय. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी हलक्या बळाचा वापर करुन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलाय.

 

4 Jan 2025, 19:10 वाजता

महाराष्ट्रतील शेतक-यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची बातमी

येत्या चार ते सहा महिन्यांत शेतक-यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सत्तेत आल्यानंतर लगेचच शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल, असं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं. मात्र आता सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी आणखी 4 ते 6 महिने थांबावं लागणार असल्याचं कृषिमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे यातून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. 

 

4 Jan 2025, 19:09 वाजता

जालन्यात राजकीय भूकंप येण्याचे संकेत

जालन्यात एक एक राजकीय भूकंप कसा होईल, हे सर्वांना दिसणार असल्याचं विधान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय. आपलं वस्त्रहरण झालं, आता चेकमेट करणारच.. अशा इशाराही माजी आमदार गोरंट्याल यांनी दिलाय.. मात्र, त्याआधी काँग्रेसमधील अनेक गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

4 Jan 2025, 19:08 वाजता

बीड प्रकरणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार 

बीड प्रकरणी 6 जानेवारीला सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्था प्रकरणी राज्यपालांना पत्र देणार आहेत. 

 

4 Jan 2025, 17:52 वाजता

नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवलं

नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवल्याची घटना समोर आलीय. सरकार वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  चोरी करणाऱ्या महिलेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे. नाशिकचा जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अवघ्या पाच दिवसाचं बाळ अज्ञात महिलेने चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ माजलीय. वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासणी केलीय. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मूळचे उत्तर प्रदेशमधील आणि सध्या सटाणा राहत असणाऱ्या सुमन अब्दुल खान या महिलेच बाळ चोरीला गेलय. 

 

4 Jan 2025, 17:48 वाजता

खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार सरकारचं लक्ष

समुद्रातील अनधिकृत बोटींवर कारवाई होणार, असा निर्णय मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणेंनी घेतला आहे. कारवाईसाठी सरकार ड्रोनची मदत घेणार आहे. खोल समुद्रातील मासेमारीवर सरकारचं लक्ष राहणार आहे. पुढील आठवड्यापासून ड्रोनचा प्रत्यक्ष वापर सुरु होणार आहे. अनधिकृत मासेमारी आणि बोटींवर कारवाई करण्यात येणार आहे. 

 

4 Jan 2025, 17:47 वाजता

ठाण्यानंतर पुण्यातूनही परप्रांतीयाचा मराठी द्वेषाची आणखी एक घटना

ठाण्यानंतर पुण्यातूनही परप्रांतीयाचा मराठी द्वेषाची आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यात मोबाईल नेटवर्क कंपनीतल्या टीम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलाय. टीम लीडर शाहबाज अहमदनं कंपनीच्या कर्मचा-यांना कार्यालयात हिंदीच बोलायचं, मराठी बोलाल तर कामावरून काढून टाकेन, अशी धमकी दिली होती. इतकंच नाही तर कुठल्याही सेनेला आणा, मराठी बोलणार नाही, असंही टीम लीडर उद्दामपणे म्हणाला होता. तसंच मराठी कर्मचा-यांवर तो अन्याय करत होता, तीन महिन्यांचा पगारही दिला नाही. ही तक्रारी घेऊन कर्मचारी मनसेकडे गेले. तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रसाद दिला..