Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून ते प्रत्येक शहरातील अपडेट्सचे सविस्तर वृत्त जाणून घ्या.
4 Jan 2025, 07:49 वाजता
राज्यात तालुका तिथे कृषी उत्पन्न बाजार समिती
राज्यात तालुका तिथे कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करणारा असून वर्षभरात राज्यातील 50 तालुक्यांमध्ये नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करणार असल्याची घोषणा राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून जगातली सर्वात मोठी कृषी बाजारपेठ मुंबईत स्थापन करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
4 Jan 2025, 07:48 वाजता
रावल यांचे मतदारसंघात करण्यात आले जंगी स्वागत
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन झाले, यावेळी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे मंत्री जयकुमार रावल यांचे आगमन होताच दोंडाईचाकरांतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यावेळी मंत्री जयकुमार रावल यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली आहे, त्याचबरोबर क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून मंत्री जयकुमार रावल यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण दोंडाईचा शहरात जंगी मिरवणूक देखील मंत्री जयकुमार रावल यांची काढण्यात आली.
4 Jan 2025, 07:44 वाजता
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस
सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट जरी झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4