Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

aharashtra Breaking News Live Updates :  दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स  पाहा एका क्लिकवर.   

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून ते प्रत्येक शहरातील अपडेट्सचे सविस्तर वृत्त जाणून घ्या. 

 

 

4 Jan 2025, 11:01 वाजता

महाकुंभमेळ्यानिमित्त डोम सिटीची उभारणी, भाविकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधल्या महाकुंभमेळ्यानिमित्त डोम सिटीची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नजीकच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिमेवरच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवली आहे.  दहशतवादी हल्ल्याच्यादृष्टीनं यूपी पोलिस सतर्क आहेत. 

4 Jan 2025, 10:50 वाजता

उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांग्लादेशी दाम्पत्याला अटक

उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गाव मधील न्यू साईबाबा कॉलनी येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचून मीना मुजिद खान आणि तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान या दोघांना ताब्यात घेतले.

4 Jan 2025, 10:50 वाजता

बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट्स

फरार तीन आरोपीं पैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे. हत्येप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा आणखी एका संशयीताला ताब्यात घेतल आहे.  एकूण तीन जण फरार होते त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  हत्येच्या 25 दिवसानंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अद्याप फरार आरोपीला शोधण्याचं काम सुरू आहे. 

4 Jan 2025, 10:18 वाजता

मनोज जरांगे परभणीतील मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना

मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहुन परभणीकडे रवाना झाले आहेत.  संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज परभणीत निषेध मोर्चा काढला जाणार आहे.  

4 Jan 2025, 09:19 वाजता

महापालिकेत आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठक 

भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महापालिकेत आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठक घेणार आहेत. पुण्यातील प्रकल्पांची स्थिती आणि समस्या याचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ , मंत्री चंद्रकांत पाटील , माधुरी मिसाळ आणि भाजपचे सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत. ११.२० वाजता बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे. 

4 Jan 2025, 09:15 वाजता

निफाड तालुक्यात आज कडाक्याची थंडी, पारा 7.3 अंश सेल्सिअस वर 

निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या थंडीपासून उब मिळवण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. 

4 Jan 2025, 08:46 वाजता

विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला आज कोर्टात हजर करणार

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी व त्यांची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण कोर्टात हजर करणार

4 Jan 2025, 08:25 वाजता

 वन विभागाने लावलेल्या पिंजय्रात ओतूर येथे बिबट्या जेरबंद

जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात मनुष्यासह पाळीव प्राण्यांवरती हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाला यश आलं असून वनविभागाने लावलेल्या पिंजय्रात हा बिबट जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असा तरी अद्यापही या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणीत असल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची हि मागणी नागरिकांकडून केली जातेय

4 Jan 2025, 08:11 वाजता

दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा बच्चू कडूंचा तडकाफडकी राजीनामा

दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांच्याकडून तडकाफडकी राजीनामा देण्यात आला आहे. निधीबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

4 Jan 2025, 07:58 वाजता

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग थेट द्राक्ष उत्पादकाच्या घरी

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचं शेतकऱ्यांशी असलेलं प्रेम नाशिक दौऱ्यावेळी पाहायला मिळालं. आपल्या नियोजित दौऱ्यात कुठलाही कार्यक्रम नसताना त्यांनी थेट द्राक्ष उत्पादक शेतकरी हर्षल काटे यांच्या घरी भेट दिली. विविध कार्यक्रमांमुळे आधीच उशीर झालेला असतानाही विमानतळा जवळ असलेल्या जानोरी गावातील थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन द्राक्ष बागांची पाहणी केली.