Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

aharashtra Breaking News Live Updates :  दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स  पाहा एका क्लिकवर.   

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून ते प्रत्येक शहरातील अपडेट्सचे सविस्तर वृत्त जाणून घ्या. 

 

 

4 Jan 2025, 16:41 वाजता

संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपला असून, केज न्यायालयाकडून तिन्ही आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची पोलीस कोठडीत रवानगी झालीय. कंपनीत जाऊन दमदाटी केली जाते, तसंच धमकावलं जातं. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येणं कठीण झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. 

4 Jan 2025, 16:03 वाजता

मुंबईतील वांद्रे परिसरातील 10 ते 15 झोपट्यांना भीषण आग

मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये झोपडपट्टीत भीषण आग लागलीय. 10 ते 15 झोपट्यांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

 

4 Jan 2025, 15:17 वाजता

'संतोष देशमुख हत्येचा खरा सूत्रधार धनंजय मुंडे'

परभणीत संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अगोदर आकाला उचला आणि संतोष देशमुख हत्येचा खरा सूत्रधार धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. शिवाय धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत थांबू नका, असं ते म्हणाले. 

4 Jan 2025, 15:16 वाजता

आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणी

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाती आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलीय. तर ज्योती मेटे यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यसरकारला सवाल उपस्थित केलेत..

4 Jan 2025, 15:15 वाजता

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूकमोर्चा 

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूकमोर्चा काढण्यात आलाय.. या मूकमोर्चात जरांगे पाटील सहभागी झालेत. तसेच संतोष देशमुख यांचं कुटुंबीयही मोर्चात सहभागी झालेत. तसेच सर्वपक्षीय नेतेही मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय.. मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झालेत.. आरोपींना फाशी देण्याची एकमुखी मागणी मोर्चातून करण्यात आली..

4 Jan 2025, 14:44 वाजता

सर्व मेट्रोंचे कामं पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. 

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मेट्रो मार्गाचा आढावा घेतला

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री माधुरी मिसाळ उपस्थित

- सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; विलंब चालणार नाही

- अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा.

- भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश 

- 22 किमी मेट्रो यावर्षी सुरू करा 

- मेट्रो-3 मुळे 20-25 किमीची त्यात आणखी भर पडेल. 

- पण पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, हे सुनिश्चित करा; फडणवीसांनी दिले टार्गेट 

- इंदू मिल स्मारक डिसेंबर 2025 अखेरीस पूर्ण करा - 

- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण. 

- या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करा

4 Jan 2025, 14:06 वाजता

संतोष देशमुख हत्याप्रकरणी सिद्धार्थ सोनवणेला अटक 

संतोष देशमुख हत्याप्रकरणी तिसरा आरोपी गजाआड झालाय. सिद्धार्थ सोनवणे हा तिसरा आरोपी असल्याची पोलिसांनी माहिती दिलीय. सिद्धार्थ सोनवणे याला संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं त्या दिवशी लोकेशन देत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय. 

4 Jan 2025, 13:07 वाजता

परभणी मूक मोर्चाला विद्यालयाच्या मैदानावरून सुरुवात

परभणी मूक मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे मुलगी वैभवी देशमुख बहीण या मोर्चामध्ये सहभागी झाली असून आमदार सुरेश धस,आमदार राजेश विटेकर,आमदार राहुल पाटील, ज्योती विनायक मेटे, मोर्चात सहभागी झाले आहेत. 

4 Jan 2025, 12:05 वाजता

ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप

 

मोबाईल नेटवर्क कंपनीच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं,मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल अशी धमकी मिळाली. या शिवाय ३ महिने कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही.  त्यावर येथील कामगारांनी मनसे कडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे म्हणून त्या टिम लीडर ने आपल्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली की "कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी"आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय.  कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला आज मनसे स्टाईल वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील मोबाईल नेटवर्क ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसे कडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे

4 Jan 2025, 11:41 वाजता

ग्रामीण भारत महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.  
ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणारा, हा महोत्सव 4 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे  आणि “गाव बढे, तो देश बढे” या संकल्पनेवर या महोत्‍सवाचे  आयोजन करण्‍यात आले आहे.