Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यातील राजकारणात सत्तास्थापनेनंतरच्या घडामोडींना वेग, राज्यात नेमकं कुठं चाललंय काय?   

Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Maharashtra Breaking News Live Updates : विदर्भापासून कोकणापर्यंत आणि मुंबईपासून गावखेड्यांपर्यंत... राज्यात नेमकं काय सुरुय? आजचा दिवस कोणत्या घडामोडींमुळं चर्चेत राहणार, कुठं काय घडणार? पाहा महत्त्वाच्या घडामोडींच्या Live Updates एका क्लिकवर... 

9 Dec 2024, 11:09 वाजता

दूध गंगा नदीवरील पुलावर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त

कोल्हापूर मधून बेळगाव कडे रवाना होणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक थोड्याच वेळात कोंगनोळी टोलनाक्याच्या जवळ पोहोचणार आहेत. पुणे बंगळुरू महामार्गावरून शिवसेना ठाकरे गटाचा ताफा बेळगावच्या दिशेने रवाना होत आहेत. कोंगनोळी टोलनाका या ठिकाणी कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
टोलनाक्याच्या अलीकडेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांना अडवले जाणार. कर्नाटक पोलिसांच्या बरोबर महाराष्ट्र पोलीस देखील तैनात कोंगनोळी टोलनाक्याच्या अलीकडे दूध गंगा नदीवरील पुलावर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 

9 Dec 2024, 10:31 वाजता

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या नजरकैदेत; बेगळगावमध्ये तणाव वाढला 

बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या नजरकैदेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकरांचा पोलिसांकडून पाठलाग. व्यायामासाठी बाहेर पडले असतानादेखील त्यांच्यामागे पोलिसाचा पाठलाग. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 

9 Dec 2024, 10:22 वाजता

एमएसईबीचा निष्काळजीपणा, विद्युत वाहिनी अंगावर पडून इसमाचा मृत्यू

हिंगोलीच्या सेनगाव येथे जीर्ण झालेली विद्युत वाहिनी वीज कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे एका वृद्धाचा अंगावर पडून विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता. या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या प्रभारी उपअभियत्यासह तिघांवर निष्काळजी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, सेनगाव येथील बसस्थानक भागात असलेल्या मुलाच्या दुकाना समोर कवठा येथील दौलत खा पठाण थांबले असता त्यांच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने ते गंभीर भाजले होते,यात त्यांचा मृत्यु झाला होता, नागरिकांच्या मागणी नंतर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

9 Dec 2024, 09:54 वाजता

अटक होईल या भीतीने शिंदे कधी बेळगावला गेले नाहीत- संजय राऊत 

सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान बेळगावच्या संवेदनशील मुद्द्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'मी स्वत: बेळगावला गेलो होते. मलाही अटक झाली होती. मंत्री असताना शिंदेंकडे सीमाभागाची विशेष जदबाबदारी होती पण अटक होईल या भीतीने ते कधीच बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही', असं ते म्हणाले.  

 

9 Dec 2024, 09:49 वाजता

अटक होईल या भीतीने शिंदे कधी बेळगावला गेले नाहीत- संजय राऊत 

सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान बेळगावच्या संवेदनशील मुद्द्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'मी स्वत: बेळगावला गेलो होते. मलाही अटक झाली होती. मंत्री असताना शिंदेंकडे सीमाभागाची विशेष जदबाबदारी होती पण अटक होईल या भीतीने ते कधीच बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही', असं ते म्हणाले.  

 

9 Dec 2024, 09:36 वाजता

खळबळ! नागपूरातील द्वारकामाई हॅाटेलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी 

नागपूरातील गणेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॅाटेलमध्ये बॅाम्ब असल्याचा मेल आल्यानं एकच खळबळ. सकाळच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला फोन. ज्यानंतर अग्निशामक दल, पोलीस आणि बॅाम्बमाशक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून शोध सुरु

 

9 Dec 2024, 09:30 वाजता

शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्रीपदं? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मंत्रिपदांसह इतर खात्यांबाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. या बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री पदाबाबत निर्णय. 

 

9 Dec 2024, 09:04 वाजता

मारकडवाडीत आलेल्या नेत्यांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

मारकडवाडी प्रकरणासंदर्भात ईव्हीएम बाबत गैरसमज पसरवणाऱ्यांच्या विरोधात होणार कारवाई, करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा.  ज्यांच्यावर कारवाई करायचे आहे त्यांच्यावर आम्ही करूच, मारकडवाडी आमच्या जिल्ह्यात आहे तेथील नागरिक आमचेच लोक आहेत त्यामुळे सर्वांवरच गुन्हा दाखल करणे योग्य राहणार नाही, काल जे मारकडवाडीत लोकप्रतिनिधी होते त्यांच्यावर देखील कारवाई होईल जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला इशारा. 

9 Dec 2024, 08:56 वाजता

निफाडमध्ये पारा 6 अंशांवर; महाबळेश्वर, माथेरानहून इथं कमालीचा गारठा 

निफाडमध्ये पुन्हा थंडीची लाट, निफाडचा पारा 6 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. थंडीचा गहू, हरभरा पिकांना फायदा. मात्र थंडीमुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली. थंडीमध्ये आरोग्याची काळजी घेण्याचं डॉक्टरांनी केलं आहे आवाहन. 

 

9 Dec 2024, 08:31 वाजता

बेळगावमध्ये कानडी पोलिसांची दडपशाही सुरूच 

बेळगावमध्ये कानडी पोलिसांची दडपशाही सुरूच आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर हे व्यायामासाठी बाहेर पडले असताना देखील त्यांच्या मागे एक पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहायला मिळालं.