Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यातील राजकारणात सत्तास्थापनेनंतरच्या घडामोडींना वेग, राज्यात नेमकं कुठं चाललंय काय?   

Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Maharashtra Breaking News Live Updates : विदर्भापासून कोकणापर्यंत आणि मुंबईपासून गावखेड्यांपर्यंत... राज्यात नेमकं काय सुरुय? आजचा दिवस कोणत्या घडामोडींमुळं चर्चेत राहणार, कुठं काय घडणार? पाहा महत्त्वाच्या घडामोडींच्या Live Updates एका क्लिकवर... 

9 Dec 2024, 20:49 वाजता

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. नार्वेकरांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल दानवेंनी त्यांचे अभिनंदन केले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी अध्यक्ष निवडीवेळी बहिष्कार घातला होता. दुसरीकडे दानवेंनी केलेल्या अभिनंदनामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

9 Dec 2024, 19:28 वाजता

आमदार योगेश टिळेकर यांचे अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. मृत सतीश वाघ यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला. पुणे ग्रामीण पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली असून हडपसर पोलीस आणि ग्रामीण पुणेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

9 Dec 2024, 19:27 वाजता

रक्त वाढीच्या गोळ्यांमधून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला

रक्त वाढीच्या गोळ्या दिल्यानंतर उमरगा तालुक्यातील गांधी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवू लागला. सुरुवातीला 19 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारनंतर आणखी अकरा विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून काही विद्यार्थ्यांना थोड्या वेळात डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रक्त वाढीच्या गोळ्या मुळेच त्रास झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज.अधिक तपासासाठी विद्यार्थ्यांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. 

9 Dec 2024, 18:59 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड झालेली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

9 Dec 2024, 17:54 वाजता

16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार हिवाळी अधिवेशन 

सोमवारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विरोधी पक्षातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ही या बैठकीला उपस्थित होते. यात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार हे निश्चित झालं आहे. 

9 Dec 2024, 17:52 वाजता

16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर मुंबईत तीन दिवसीय विधानसभा अधिवेशन भरवण्यात आलं होतं. यात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे. 

9 Dec 2024, 16:56 वाजता

RBI चे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती 

संजय मल्होत्रा ​​यांची RBI नवे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मागील असाइनमेंटमध्ये, त्यांनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.

 

9 Dec 2024, 16:55 वाजता

एनसीपीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत दिल्लीत होणार बैठक

सोमवारी एनसीपीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. दिल्लीत 5 वाजता ही बैठक होणार असून पवारांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार. पराभूत उमेदवार EVM विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती असून पुन्हा निवडणूका घेण्याची मागणी करणार आहेत. एनसीपी पराभूत उमेदवार कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

9 Dec 2024, 16:28 वाजता

Breaking news : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे, एसएनडीटी यासह अन्य ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. 

9 Dec 2024, 15:55 वाजता

शिवसेना UBT पक्षाने राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला 

महाराष्ट्र सरकारचं तीन दिवसीय अधिवेशन मुंबई येथील विधानभवनात सुरु असून सोमवारी विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. या राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेना UBT पक्षाने बहिष्कार टाकला असल्याची माहिती त्यांच्या आमदारांनी दिली.