2 Jul 2023, 14:30 वाजता
अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Maharashtra Politics : अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री
2 Jul 2023, 14:24 वाजता
थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट, थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर राष्ट्रवादीचे 40 आमदार शपथ घेण्याची शक्यता.
2 Jul 2023, 14:02 वाजता
राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत- सूत्र
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीये. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती मिळतेय. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे शपथ घेण्याची शक्यता
2 Jul 2023, 13:38 वाजता
अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार- सूत्र
Maharashtra Politics : राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याची शक्यता. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहे. तर आता राज्याला 2 उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. तर थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे 9 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ घेणार. शिवसेना, भाजपचेही 3 ते 4 जण शपथ घेणार असल्याची झी 24 तासला सूत्रांची माहिती.
2 Jul 2023, 13:32 वाजता
राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार?
NCP : राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे काही आमदारांसह अजित पवार राज्यपालांच्या भेटीला गेलेत. थोड्याच वेळात अजित पवार दाखल होण्याची शक्यता
2 Jul 2023, 13:17 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन पक्ष निर्णय घेईल','असा निर्णय घेण्यासाठी पक्षाची घटना आहे', 'विरोधी पक्षनेतेपदात अजित पवारांची इच्छा नव्हती', 'संघटनेत काम करण्याची अजित पवारांची बैठक' 'प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय मी एकटा घेत नाही', 'अजित पवार म्हणाले संघटनेत काम करायचंय', 'बैठकीत प्रदेशाध्यक्षपदावर निर्णयाची शक्यता', शरद पवार यांची माहिती.
2 Jul 2023, 13:06 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'मुंबईतील बैठकीची माहिती नाही', 'बैठक बोलावण्याचा विरोधी पक्षनेत्यांना अधिकार', 'बैठक का बोलावली माहिती नाही', 'नगरचा कार्यक्रम आठवड्याआधीच रद्द झालाय', 'नगरचा दौरा आठवड्याआधीच रद्द','नव्या नेतृत्वाला संधी द्यावी असा पक्षात विचार', '6 जुलैच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय','दिल्लीत मीही गेलो, अजित पवारही गेलो', 'दिल्लीत लग्न सोहळ्याला आम्ही एकत्र होतो,' अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया.
2 Jul 2023, 12:41 वाजता
पुण्यात पती-पत्नीचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला
Pune Crime News : पुण्यात कोयता विकण्यावरून पती-पत्नीनं चक्क एकमेकांवर कोयत्यानंच हल्ला केलाय. यात दोघेही गंभीर जखमी झालेत. ही घटना मार्केटयार्डातील एक सोसायटीमध्ये घडलीय. घरातील कोयता विकण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी पत्नीनं पतीवर कोयत्यानं वार केले. संतप्त झालेल्या पतीनं पुन्हा त्याच कोयत्यानं पत्नीवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बातमी पाहा- कोयतामुळे जोडप्यात झाला टोकाचा वाद! बातमी ऐकून लावाल डोक्याला हात
2 Jul 2023, 12:13 वाजता
राष्ट्रवादीत हालचालींना वेग
NCP : राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. मुंबईत अजित पवारांनी बैठकांचा धडाका उडवून दिल्यावर पुण्यात पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेतही घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी थोड्याच वेळापूर्वी पवारांची भेट घेतली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थोड्याच वेळात मोदी बागेत पोहोचत आहेत. ते पवारांची भेट घेणार आहेत.
2 Jul 2023, 11:35 वाजता
समृद्धीवरील बस अपघातातील मृतांच्या पार्थिवावर आज सामूहिक अंत्यसंस्कार
Samruddhi Expressway Bus Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातातील मृतांच्या पार्थिवावर आज सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलीय. फॉरेन्सिक एक्सपर्टसना सोबत घेऊन नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आलाय...यामुळे सर्व मृतकांचे नातेवाईक बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचलेयत. या अपघातात कुणी मुलगा गमावलाय तर कुणी मुलगी...कुणाची आई गेलीय तर कुणाचे बाबा...भयानक घडलेल्या या अपघातात 25 जणांना जीव गमवावा लागलाय.
बातमी पाहा- अपघातातील मृतांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार होणार