2 Jul 2023, 11:14 वाजता
2023 मध्ये घर विक्रीत पुणे राज्यात अव्वल
Pune Home Sale : राज्यात घर घेण्यासाठी सर्वसामान्य पुणे शहराला सर्वाधिक पसंती देत असल्याचं दिसून येतंय.. 2023 मध्ये घर विक्रीत पुणे राज्यात अव्वल ठरलंय.. वर्षाच्या दुस-या तिमाहीत पुण्यात 20 हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झालीय... अनेक लोकांनी पुणे शहरात घर घेण्यास पसंती दाखवलीय.. पुणे शहरात गृह विक्रीत 65 टक्क्यांनी वाढ झालीय.. स्थायिक होण्यासाठी व्यावसायिक तसंच नोकरदार वर्गही पुणे शहराला पसंती देताना दिसतोय.. आयटी हब, शिक्षणाच्या सुविधा, ऐतिहासिक महत्त्व अशा गोष्टींमुळे पुणे शहराचं महत्त्व वाढतंय.
बातमी पाहा- पुणे ठरले घरांच्या विक्रीत अव्वल, नागरिकांची मुंबईमागोमाग पुण्याला पसंती
2 Jul 2023, 10:43 वाजता
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?
Jayant Patil : राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण राष्ट्रवादीत प्रचंड वेगाने घडामोडी घडतायत. एकीकडे अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार दाखल झालेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झालेत.. जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच इस्लामपूरवरुन मुंबईकडे निघालेत.. मुंबईत दाखल झाल्यानंतर जयंत पाटीलही राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार असल्याचं कळतंय... प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्यास जयंत पाटील यांची नाराजी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय..
बातमी पाहा- जयंत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना, पक्षात मोठे बदल घडण्याची शक्यता
2 Jul 2023, 10:05 वाजता
मालेगावात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा
Malegaon Hindu Jan Akrosh Morcha : नाशिकच्या मालेगावमध्ये सकल हिंदू समाजातर्फे आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.. तर, आजच इन्सानियत बचाव समितीतर्फे शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. तेव्हा या दोन्ही मोर्चांमुळे मालेगावातलं राजकीय वातावरण मात्र तापलंय.. हिंदू जनआक्रोश मोर्चाला भाजप आमदार नितेश राणे हजेरी लावणार आहेत.. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहादरा विरोध, धर्मांतरण बंदी कायदा अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा निघेल.. तर त्याच दिवशी माजी आमदार रशीद शेख आणि आसिफ शेख शांती मोर्चा काढणार आहेत.
बातमी पाहा- मालेगावात वातावरण तापणार? राणेंचा हिंदू आक्रोश मोर्चा; तर शेख काढणार शांती मोर्चा
2 Jul 2023, 09:41 वाजता
शरद पवारांचं नाव शकुनी मामा लिहिलं जाईल- सदाभाऊ खोत
Sadabhau Khot on sharad pawar : महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवारांचं नाव शकुनी मामा म्हणून लिहिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. सोलापुरातल्या कासेगाव इथल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना खोतांनी पवारांवर आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी असल्याची टीकाही खोतांनी केली.
बातमी पाहा- "शरद पवार म्हणजे शकुनी मामा" खोत यांची राष्ट्रवादी आणि पवारांवर सडकून टीका
2 Jul 2023, 09:11 वाजता
राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष आज अजित पवारांची भेट घेणार
Meeting with NCP MLA Ajit Pawar : राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत आता मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. आमदार धनंजय मुंडे, किरण लहमाटे आणि दौलत दरोडा अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत... राष्ट्रवादीचे आणखीही काही आमदार तसंच जिल्हाध्यक्ष आज अजित पवारांची भेट घेणार आहेत... राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय न झाल्यानं ही भेट असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या देवगिरी शासकीय बंगल्यावर छोटेखानी खासगी कार्यक्रम असल्याचं कळतंय..
बातमी पाहा- राष्ट्रवादीत पुन्हा उलथापालथ होणार? आमदार घेणार अजित पवारांची भेट
2 Jul 2023, 08:34 वाजता
मुंबईच्या धरण क्षेत्रात संततधार
Mumbai Rain : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणक्षेत्रात दररोज मोठी वाढ होत आहे. गेल्या शनिवारी 6.49 टक्क्यांवर आलेला पाणीसाठा आठच दिवसांत 12.85 टक्क्यांवर पोहोचलाय. सध्या धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. रोज 100 ते 150 मिमी पावसाची नोंद होत आहे. मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. धरणांमध्ये 1 ऑक्टोबरला 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणं शक्य होतं.
बातमी पाहा- मुंबईकरांसाठी गुड न्यूज! एक आठवड्यात धरणक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी
2 Jul 2023, 08:03 वाजता
भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक
BJP Core Committee Meeting today : भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तार तसंच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
2 Jul 2023, 07:49 वाजता
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
State Cabinet Expansion : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना तातडीने मुंबईला बोलावलंय. आज सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक होणार आहे. तसंच भाजपनेही त्यांच्या काही मंत्र्यांना तातडीने बोलावलंय.
2 Jul 2023, 07:36 वाजता
राज्यभरात पावसाचा इशारा
State Rain : कोकणात येत्या आठवड्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून कोकणता पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबईत आज मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोल्हापूर घाट परिसर, साता-यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
बातमी पाहा- हवामान विभागाने दिला पावसाचा अलर्ट, पाहा कुठे कोसळणार पावसाच्या सरी