Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Jun 2024, 17:40 वाजता

फोडाफोडीचं राजकारणाला जनतेला मान्य नाही', एकनाथ खडसेंचं वक्तव्य

 

Eknath Khadse On Exit Poll : एकनाथ खडसेंनी एक्झिट पोलवर आपली प्रतिक्रिया दिलीये...नरेंद्र मोदींचा अबकी बार 400 पार अशी घोषणा केली होती, त्या अनुषंगाने चित्र दिसत असल्याचं खडसे म्हणालेत..तर फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेनं नाकारल्याचं दिसत असून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत सहानुभूतीची लाट असल्याचंही खडसे म्हणालेत....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Jun 2024, 16:12 वाजता

पुण्यात पोलिसानं तरुणाकडून घेतले पाय दाबून 

 

Pune Police : पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप समोर आलाय.. या पोलीस अधिकाऱ्याने चक्क एका तरुणाकडून स्वत:चे पाय दाबून घेतलेत.. कल्याणीनगरमधील नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी दुचाकीवरुन जाणा-या तरुणांना अडवलं.. आणि यातील एका तरुणाकडून या पोलिसांनं स्वत:चे पाय दाबून घेतले.. पुणे पोलीस अधिकाऱ्याचा हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.. 

2 Jun 2024, 14:14 वाजता

Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंच्या उघडपणे हालचाली सुरू असून, त्यांना आघाडीमध्ये राहायचं नाहीये...त्यामुळे उद्धव ठाकरे मोदींसोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको...असा दावा शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केलाय...शिरसाट यांच्या दाव्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jun 2024, 14:07 वाजता

कळंबा जेलमध्ये कैद्याची हत्या

 

Kolhapur Murder : कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या झालीय...कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत खुनाची घटना घडलीय...मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचं नाव असून, तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता...तो आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता...त्यावेळी जेलमध्ये असलेल्या 5 आरोपींनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण केली...या मारहाणीत कैद्याचा जागीच मृत्यू झाला...प्रतीक उर्फ पिल्या पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार, सौरभ सिद्ध अशी आरोपींची नावं आहेत...या घटनेमुळे कळंबा जेलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jun 2024, 13:59 वाजता

आमदार यशोमती ठाकूर यांचं धक्कादायक विधान

 

Amravati Yashomati Thakur : अमरावतीचा निकाल विरोधात गेला तर यादवी माजेल, असं धक्कादायक विधान काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केलंय. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार NDA ला मोठं बहुमत मिळताना दिसतंय. त्यामुळे माजी मंत्री यशोमंत्री ठाकूर आक्रमक झाल्यात. अमरावतीत पंजा निवडणून येईल. निकाल विरोधात लागला तर सिव्हिल वॉर होईल, असं विधान त्यांनी केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jun 2024, 11:55 वाजता

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ

 

Pune Crime : पुण्यातील कोयता गँगची दहशत कमी होण्याऐवजी वाढतच चाललीये..... हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात कोयता गँगनं धुमाकूळ घातलाय. इथल्या बाजारातील अनेक दुकानांत घुसुन कोयता गँगनं तोडफोड केलीये.. तोडफोडीची ही दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालीत.. रस्त्यावर उभी असलेली वाहनंही या गुंडांनी फोडली.. नागरिकांमध्ये दहशत  पसरवण्याच्या उद्देशानं ही तोडफोड करण्यात आली.. शुक्रवारी रात्री ही घटना घडलीये. यामुळे स्थानिकांमध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत पसरलीये.. पोलीस या गुंडांवर काय कारवाई करणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 

2 Jun 2024, 11:51 वाजता

अत्यंत फ्रॉड असा एक्झिट पोल-राऊत

 

Sanjay Raut : कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत...एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड असून, ध्यान साधना केलेल्या मोदींसाठी 360 जागा काहीच नाहीत...या पोलवरून भाजपला 800 ते 900 जागा मिळतील, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केलीय...ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाहीत...गेल्या 24 तासात अमित शाहांनी 180 कलेक्टरना फोन करून धमकावलं असा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jun 2024, 11:01 वाजता

एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले दिसतील - विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar On Exit Poll : एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले दिसतील...290+ जागा इंडिया आघाडीला मिळतील आणि महाराष्ट्रात 35+ जागा मविआ जिंकेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय...चार तारखेलाच याचं चित्र स्पष्ट होईल...मात्र, पक्ष फोडणा-यांना यावेळी मोठी चपराक बसेल...पक्ष फोडणा-यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही हे यातून दिसतंय असं वडेट्टीवारांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jun 2024, 10:22 वाजता

पुणे कार अपघातानंतर RTO प्रशासनाला जाग

 

Pune RTO : पुणे कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओला जाग आलीय...नोंदणी न केलेल्या वाहन विक्रेत्यांचा शोध घेतला जातोय...ज्या गाड्यांची नोंदणी नाहीये अशा विक्रेत्याचे ट्रेड सर्टिफिकेट निलंबित केलं जाणाराय...पुण्यातील कार अपघातात अल्पवयीन मुलाने चालविलेली पोर्श कारची नोंदणी केलेली नव्हती...ती बंगळुरू येथील वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरती नोंदणी करून आणण्यात आली होती...मात्र, रस्त्यावर कार आणण्याची परवानगी नसतानाही अपघात झाला...त्यानंतर आता पुणे आरटीओने शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची शोध मोहीम सुरू केलय...शहरात विना नोंदणी न करता रस्त्यावर आणलेली तीन वाहने आढळून आलीयत...ही वाहनं ज्या विक्रेत्यांकडून घेतली त्यांना नोटीस बजावून कारवाई केली जाणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jun 2024, 09:02 वाजता

विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू

 

Pandharpur : पंढरपुरात आजपासून विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनास सुरूवात झालीये. मूर्तीचं जतन संवर्धन केल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पदस्पर्श दर्शनास सुरूवात झालीये. त्यामुळे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची नित्य पूजा करण्यात आली. त्यानंतर दर्शनास सुरूवात झालीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा -