2 Mar 2023, 23:11 वाजता
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Devendra Fadanvis On Uddhav Thackeray : आत्मपरीक्षण करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आलीय. 40 लोक नाकाखालून गेले तरी त्यांना कळलं नाही. दुस-याचा घरात मुलगा झाला म्हणून पेढे कसले वाटता असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadanvis) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. विरोधकांना विजयाची सवय नाही. त्यामुळे एखादा विजयही त्यांना मोठा वाटतो असही ते म्हणाले. चिंचवडमध्ये ठाकरे-पवारांना प्रचारात उतरवलं, मग तिथे पराभव कुणाचा झाला? असा सवालही त्यांनी केलाय.
बातमी पाहा - 28 वर्ष भाजपच्या ताब्यातील कसबापेठ काँग्रेसकडे, फडणवीस माध्यमांसमोर येऊन म्हणाले, आम्ही...
2 Mar 2023, 22:05 वाजता
पुढील शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकाच वही
Text Book With Notebook : शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... पुढच्या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकातच वहीची पानं समाविष्ट केली जाणार आहेत. तिसरी ते दहावीच्या पुस्तकांमध्ये वहीची पानं जोडण्याचा शासन निर्णय आज जारी झाला. 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अमलबजावणी होणाराय. त्यानुसार पुस्तकातील पाठ, कवितेच्या शेवटी वहीची 2 पानं जोडली जाणार आहेत. माझी नोंद या सदराखाली मुलांनी या दोन वह्यांच्या पानांचा वापर करणं आवश्यक असेल, असं सरकारनं आदेशात म्हटलंय. या पानांवर विद्यार्थ्यांकडून शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्याच्या नोंदी होणं आवश्यक आहे.
बातमी पाहा - पुढच्या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकांबाबत होणार मोठा बदल, विद्यार्थी आणि पालकांनो ही बातमी पाहाच
2 Mar 2023, 21:16 वाजता
सतेज पाटील विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते
Satej Patil : माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची विधानपरिषदेत (VidhanParishad) काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे (Neelam Gorhe) यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली. पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सतेज पाटलांनी नियुक्तीनंतर व्यक्त केलीय.
बातमी पाहा - थोरातांनी आमदार सतेज पाटलांकडे सोपवली मोठी जबाबदारी, विधान परिषदेत काँग्रेस गटनेतेपदी नियुक्ती
2 Mar 2023, 21:12 वाजता
आम्ही पुन्हा येऊ - फडणवीस
Devendra Fadanvis Tweet : कसबा आणि चिंचवडच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलंय. जनतेचे आभार मानताना थोडे आशीर्वाद कमी पडले. मात्र हे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ असंही फडणवीसांनी म्हंटलंय.
बातमी पाहा - देवेंद्र फडणवीसांचं "... पुन्हा येऊ", फडणवीसांच्या या विधानाचा नेमका काय अर्थ? पाहा त्यांचं ट्विट
2 Mar 2023, 20:40 वाजता
हिंडनबर्ग-अदानी प्रकरणात मोठा निर्णय
Supreme Court On Adani : हिंडेनबर्ग-अदानी घोटाळ्यात सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतलाय. सुप्रीम कोर्टानं 6 सदस्यीय समिती नेमलीय. निवृत्त न्यायमूर्ती एएम सप्रे हे या समितीचे प्रमुख असतील.यांच्याशिवाय या समितीमध्ये ओपी भट्ट, न्यायमूर्ती केपी देवदत्त, केव्ही कामत, एन नीलेकणी, सोमशेखर सुंदरसन यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर सेबी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवेल आणि २ महिन्यांत अहवाल सादर करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. सेबीला २ महिन्यांत अहवाल सादर करायचा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय.
बातमी पाहा - अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला आदेश
2 Mar 2023, 20:15 वाजता
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा विजय
Chinchwad Ashwini Jagtap : चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा ३६ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय झालाय. जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा (Nana Kate) पराभव केलाय. जगताप यांना १ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त मतं पडली आहेत. तर नाना काटे यांना ९६ हजार मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटांचे बंडखोर राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी तब्बल ४० हजारांच्या आसपास मतं घेतली आहेत. त्यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांनी मान्य केलं.
बातमी पाहा - चिंचवडमधून मोठी बातमी आली : अश्विनी जगताप विजयी, पाहा एकूण किती मतं मिळाली?
2 Mar 2023, 20:12 वाजता
राज्यात 4 ते 6 मार्च पावसाचा इशारा
Rain Prediction : 4 ते 6 मार्च दरम्यान राज्यातल्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं ही शक्यता वर्तवलीय. फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे.
2 Mar 2023, 17:34 वाजता
संसद कार्यालयातील आदित्य, उद्धव ठाकरेंचे फोटो चोरीला - विनायक राऊत
Vinayak Raut : संसदेच्या कार्यालयातले उद्धव (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) फोटो चोरीला गेल्याची तक्रार ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलीय. राऊतांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय. शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचं संसदेतलं कार्यालय ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून त्याजागी आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोटो लावण्यात आले होते.
बातमी पाहा - संसदेच्या कार्यालयातील उद्धव आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला - ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची तक्रार
2 Mar 2023, 16:54 वाजता
अभिनेत्री सुष्मिता सेनला हार्ट अटॅक
Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनला (Shumita Sen) हार्ट अटॅक आलाय. स्वत: सुष्मिता सेननं सोशल मीडियात पोस्ट टाकत त्याविषयीची माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी सुष्मिताला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता. त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
बातमी पाहा - सुष्मिता सेनला हार्ट अटॅक! जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती...
2 Mar 2023, 16:14 वाजता
ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली
Kalyan Rajul Patel On Eknath Shinde : कल्याणमध्ये आयोजित ठाकरे गटाच्या (Thackeray Camp) शिवगर्जना मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची जीभ घसरली..मुंबईच्या विभाग संघटक राजुल पटेल (Rajul Patel) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Chief Minister Eknath Shinde) शिव्यांची अक्षरशः लाखोली वाहिली.
बातमी पाहा - मुख्यमंत्र्याना शिव्यांची लाखोली, ठाकरे गटाच्या महिला नेत्या राजुल पटेलांची जीभ घसरली, पाहा वक्तव्य