2 Mar 2023, 14:04 वाजता
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'शिक्षक -पदवीधारांनी दिलेले निकालही बोलके', 'कसब्यातील मतदारांनी वेगळा विचार केला', 'कसब्यामध्ये जिंकल्याचा आनंद','भाजपविरोधी मतांची संख्या वाढतेय','एकत्र राहून मतांनी बेरीज करणं हे मविआचं काम', 'टिळकांचा, बापटांचा वापर करून फेकून दिलं','मतदारांनी भाजपला म्हणून स्वीकारलं नाही', 'वापर करा आणि फेका ही भाजपची रणनीती','मतदारांनी भाजपला म्हणून स्वीकारलं नाही', 'संजय राऊत दौऱ्यावरून आल्यावर त्यांना विचारेन',संजय राऊतांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया.
2 Mar 2023, 13:57 वाजता
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'सुप्रीम कोर्टाचा निकाल लोकशाही जिवंत ठेवणारा', ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत,'निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?', 'सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलासादायक', आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचं कोर्टासमोर ठेऊ','शिवसेनेचा निर्णय देताना आयोगाकडून अन्याय','नियुक्तीबाबत नव्याने केलेल्या बदलाचं स्वागत', 'वेबंदशाहीला रोखलं नाही तर हुकुमशाही सोकावेल', उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
2 Mar 2023, 13:09 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कुणाला विकत घेऊ शकतो हा अहंपणा नको', 'मतदारांना गृहित धरता कामा नये', 'गिरीश बापटांना विश्रांतीची गरज', 'प्रकृती ठीक नसतानाही प्रचारात उतरवलं', 'बापट यांना तरीही त्यांना भाजपनं प्रचारात उतरवलं' अजित पवारांचा भाजपवर निशाणा.
2 Mar 2023, 13:02 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'जनता ठरवते तेव्हा सहानुभूतीचा विचार होत नाही','धंगेकरांच्या विजय हा मविआच्या एकजुटीचा', 'मनसे कार्यकर्त्यांनी धंगेकरांना मदत केली','मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांचं ऐकलं नाही', 'काटे-कलाटेंची एकत्रित मतं भाजपपेक्षा अधिक', 'मतांच्या विभागणीमुळे पराभूत झालो','सामान्यांना भेटून सामान्यांनीच पराभव केला', विरोधी पक्षनेते अजित पवारांची नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका.
2 Mar 2023, 12:53 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कसब्यात मविआनं एकजुटीनं काम केलं','धंगेकरांसारख्या उमेदवारामुळे अर्धा विजय', 'माझी परिस्थिती थोडी खुशी, थोडी गम अशी', 'राहुल कलाटेंनी माघार घेऊ नये यासाठी प्रयत्न', विरोधी पक्षनेते अजित पवारांचा नाव न घेता भाजपवर आरोप. 'सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणांचा वापर केला' 'कलाटेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला' अजित पवारांकडून धंगेकरांचं अभिनंदन.
2 Mar 2023, 12:14 वाजता
कसबा मतदारसंघात ऐतिहासिक निकाल
Kasba Bypolls Result 2023 : कसबा मतदारसंघात ऐतिहासिक निकाल. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 10,950 मतांनी विजयी, भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झालाय. कसब्यात 28 वर्षांनंतर भाजपचा पराभव झालाय.
2 Mar 2023, 10:44 वाजता
अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरणार
Maharashtra Assembly Session : विधीमंडळ कामकाज अर्थसंकल्प अधिवेशन आजचा दिवस पुन्हा गाजणार आहे हंक्कभंग मुद्दावरुन. संजय राऊतांविरोधातला हक्कभंग मुद्दा आज पुन्हा सभागृहात निघण्याची शक्यता आहे.. त्याचवेळी गॅस सिलेंडरच्या दरातली वाढ, महागाई , शेतकरी समस्या, वीजदरवाढ या मुद्द्यांवरूनही विरोधक आक्रमक होणार आहेत. कालप्रमाणेच आजही विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत.. मात्र त्याचवेळी सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय ते कसबा-चिंचवड पोट निवडणूक निकालाकडे. त्याचेही पडसाद विधीमंडळात उमटण्याची शक्यता आहे.
2 Mar 2023, 09:02 वाजता
दहावीच्या परीक्षा आजपासून सुरु होणार
SSC Exam : दहावीच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात करण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे. 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे.. परीक्षेआधी प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्याला वर्गात सोडलं जाईल. त्यासाठी पोलिस पाटील, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. तसंच पेपर सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळणार आहे. विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षा केंद्र परीसरातील झेरॉक्स बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. पानपट्टी, टायपिंग आणि संगणक सेंटर तसंच इंटरनेट कॅफेही बंद ठेवण्यात येतील..
2 Mar 2023, 08:16 वाजता
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज अखेरची सुनावणी होणार आहे. आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस असणार आहे. सध्या शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. आज हा युक्तिवाद पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट दुपारी 4 वाजता निकालाचा दिवसही ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
2 Mar 2023, 07:33 वाजता
मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
Nagaland, Tripura, Meghalaya Assembly Elections Results 2023 : ईशान्य भारतातील मेघाल, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी,आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टीची सत्ता आहे.. ते आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.