2 Mar 2023, 07:18 वाजता
कसबा, चिंचवड मतदारसंघात आज मतमोजणी
Chinchwad, Kasba Bypolls Result 2023 : पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठीची आज मतमोजणी पार पडणार. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागलंय. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्याची मतमोजणी अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. इथं मतमोजणीच्या 20 फेऱ्या होतील. तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन इथं होणारेय. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार.