Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज?

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज?

2 Oct 2023, 22:39 वाजता

बेईमान लोक शिवाजी पार्क बळकावतायेत- संजय राऊत

 

Sanjay Raut vs Sanjay Shirsat : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने आलेत. 50 ते 55 वर्षांपासून आम्ही याठिकाणी दसरा मेळावा करतोय. मात्र आता बेईमान लोक त्यावर दावा करतायेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली हा विचार लोकांपर्यंत जावा म्हणून आम्ही शिवतीर्थासाठी आग्रही आहो असं संजय शिरसाटांनी म्हंटलंय. 

2 Oct 2023, 22:00 वाजता

आंबेडकरांना अटक करा- नारायण राणे

 

Prakash Ambedkar vs Narayan Rane : दंगलीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात जोरदार वाद पेटलाय... हल्ला होणार याची माहिती असेल तर आंबेडकरांना अटक करा, अशी मागणी राणेंनी केली होती. त्यावर चिंधीचोर राणेंनी माझ्याशी वाद घालू नये, असा पलटवार आंबेडकरांनी केलाय

2 Oct 2023, 21:20 वाजता

बुलढाण्यात गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरी

 

Buldhana Gajanan Maharaj : गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरीचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घडतोय.. सुटाळ पुरा गावात अशोक सातव यांच्या घरी एक व्यक्ती आली जी हुबेहुब गजानन महाराजांसारखी दिसतेय. ही व्यक्ती आल्यानंतर साक्षात महाराज प्रकटले अशी बातमी पसरली आणि या ठिकाणी बघ्यांची आणि भक्तांची गर्दी जमली.. शेकडो लोकं गजानन महाराजांचा जयघोष करत दर्शनासाठी जमा झाले. ही व्यक्ती कोण आहे, कुठून आली याचा आता शोध घेतला जातोय. मात्र गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरीच्या या प्रकाराची राज्यभर चर्चा सुरु आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Oct 2023, 20:25 वाजता

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांचं आंदोलन मागे

 

Onion Auction to Resume ​ : अखेर नाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटलीय. उद्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापा-यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतलंय. कांदा व्यापा-यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठकही झाली मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर कांदा व्यापा-यांना आंदोलन सुरूच ठेवलं होतं. मात्र शेतक-यांचं वाढतं नुकसान लक्षात घेऊन आता कांदा खरेदी-विक्री सुरू करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Oct 2023, 20:07 वाजता

ठाकरे-पिता पुत्र नकली वाघ- चित्रा वाघ

 

Chitra Wagh : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधलाय. एक्सवरून ट्विट करत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. कवितेच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी ही टीका केलीय. ठाकरेंनी वाघाचं कातडं पांघरून सोंग आणलंय. मात्र काँग्रेसचं बाहुलं किती पावलं चालणं अशी खिल्ली चित्रा वाघ यांनी उडवलीय. ठाकरे-पिता पुत्र हे नकली वाघ असल्याचंही चित्र वाघ यांनी म्हंटलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

2 Oct 2023, 19:35 वाजता

लातूरच्या निलंगा तालुक्यातील गावांना भूकंपाचा धक्का

 

Latur Earthquake : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी आणि परिसरात भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता 02.08 इतकी नोंद झालीय. या भूकंपाच्या धक्क्याने हासोरी आणि परिसरातील नागरीक अक्षरशः भयभीत झालेत. धक्का जाणवताच लोक घराबाहेर पडले. यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. गेल्यावर्षीच या गावात सहा धक्के जाणवले होते. आज भूकंपाचा धक्का जाणवताच परिसरातील गावकरी पुन्हा एकदा भयभीत झालेत.

 

2 Oct 2023, 19:21 वाजता

भाजपची उद्या आगामी लोकसभा तयारी आढावा बैठक

 

BJP Meeting : भाजपची उद्या आगामी लोकसभा तयारी आढावा बैठक. बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थितीत राहणार. राज्यातील सर्व जिल्ह्यातील लोकसभा तयारीचा आढावा घेतला जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार.  उद्या दादरच्या वसंत स्मृतीमध्ये सकाळी  10 ते 5 वाजेपर्यंत  बैठक होणार

2 Oct 2023, 18:54 वाजता

आमदार रोहित पाटील यांची प्रकृती खालवली

 

Rohit Patil : पाण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान आमदार रोहित पाटील यांची प्रकृती खालवलीय. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमन पाटील यांच्यासह रोहित पाटलांचं सांगलीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. टेंभू सिंचन योजनेच्या 8 टीएमसी पाण्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. याच उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची तब्येत बिघडलीय. दुपारनंतर त्यांचा ताप वाढला होता. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करू नका, असा शब्दांत भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी उपोषण आंदोलनावर टीका केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Oct 2023, 18:31 वाजता

भारतात पहिल्यांदाच बिहार राज्यात जातनिहाय जनगणना

 

Bihar Caste wise Census : बिहार सरकारने जातीय जनगणनेचा रिपोर्ट जारी केलाय...देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर करण्यात आलीय...बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 27 टक्के इतकी आहे...तर खुल्या प्रवर्गातील लोकसंख्या 15.52 टक्के इतकी आहे...एससी 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या फक्त 2 टक्के एवढी आहे...महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होतेय...आम्ही बिहारच्या जातीय जनगणनेच्या अहवालाची वाट पाहतोय...असं विधान गेल्या आठवड्यात फडणवीसांनी केलं होतं...त्यानंतर राज्याविषयी काय करायचं ते ठरवू असं फडणवीस म्हणाले...त्यामुळे आता महाराष्ट्रातही जातीय जनगणना होणार का? असा सवाल उपस्थित होतोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Oct 2023, 18:00 वाजता

अजित पवार गटातले मंत्री नाराज?

 

Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज आहेत. दोन महिने उलटूनही मंत्र्यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे अजित पवार गटाचे मंत्री नाराज आहेत. काही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पद देण्यासाठी उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. त्यानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप लवकरात लवकर केलं जाईल, असे सांगण्यात आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-