2 Oct 2023, 17:27 वाजता
नाशिकमधील कांदा कोंडी फुटणार
Nashik Onion Traders : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापारी दोन पाऊल मागे हटणार. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता. व्यापाऱ्यांच्या कोर कमिटीची बैठक सुरू ,थोड्याच वेळात होणार निर्णय. संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय थोड्याच वेळात पालकमंत्री दादा भुसे करणार घोषणा.
2 Oct 2023, 17:01 वाजता
मनसे महिला आघाडीची टोलनाक्यावर मारहाण
Chhatrapati Sambhaji Nagar MNS : समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर काम करणारे मराठी कर्मचारी तरुणांना परप्रांतीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करीत मनसे महिला आघाडीच्या महिलांनी टोल नाक्यावरील परप्रांतीय अधिकाऱ्याला मारहाण केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर घडली. मराठी माणसाला त्रास झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Oct 2023, 16:16 वाजता
नांदेडमध्ये 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू
Nanded Government Hospital : नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. तर सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Oct 2023, 16:09 वाजता
कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना चोप
Kalyan MNS : कल्याणमध्ये मनसेची फेरीवाल्यांना मारहाण, कल्याण स्कायवॉक वरची घटना. मराठी बोलण्यावरून मराठी तरुणाचा परप्रांतीय फेरीवाल्यांशी झाला वाद. आधी फेरीवाल्यांकडून मराठी तरुणाला मारहाण. मराठी तरुणाची मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार. तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी स्काय वॉक वर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना दिला चोप.
2 Oct 2023, 14:59 वाजता
मुंबईत इंडिया आघाडीचं आंदोलन
Mumbai India Aghadi Andolan : केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. गांधी जयंतीच्या निमित्तानं काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमाजवळ हे आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
2 Oct 2023, 13:14 वाजता
ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक
Kolhapur Raju Shetty : ऊस दरासाठी राजू शेट्टींनी आक्रमक पवित्रा घेतलाय. राजू शेट्टी आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. आजपासून साखर कारखान्यांची साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. ऊसाला एफआरपी अधिक 400 रूपये दर द्यावा अशी राजू शेट्टींची मागणी आहे. त्यासाठी 17 ऑक्टोबर पासून ते 7 नोव्हेंबर पर्यत ते आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. 7 तारखेला ऊस परिषदेनं आत्मक्लेश आंदोलनाची सांगता होणारयं. शिरोळच्या दत्त साखर कारखान्यापासून आंदोलनाला सुरुवात होईल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Oct 2023, 13:10 वाजता
मनसे नेत्याच्या विधानावर राजकारण जोरात
Supriya Sule, Sanjay Shirsat & Nitesh Rane : जनतेच्या मनातले मुख्यमंत्री राज ठाकरेच असं विधान मनसे नेत्यांनी केलंय... मात्र यावरुन राजकारण जोरात सुरु झालंय.. आमदार निवडून आले तरच मुख्यमंत्री होता येतं असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Oct 2023, 13:06 वाजता
राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री - अभिजीत पानसे
Raj Thackeray : राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत...त्यांच्यामुळेच सध्या हिंदू सण जोरात साजरे केले जातायत अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसेंनी दिलीय...सध्या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक सुरू असून, या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा घेतलेल्या आढाव्याबाबत चर्चा होणार आहे...काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती...त्याचा अहवाल आज सर्व नेते सादर करणार असल्याची माहिती आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Oct 2023, 12:56 वाजता
वाघनखांवरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपली
Ashish Shelar Tweet : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपलीय.. भाजप आमदार आशिष शेलारांनी वाघनखांवरुन आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय.. वाघनखं येणार कळताच नकली वाघ का बिथरले? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का? असा सवाल आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Oct 2023, 11:53 वाजता
स्वामी समर्थांचा प्रसाद घरबसल्या मिळणार
Swami Samarth Prasad Online : अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्तांना आता घरबसल्या महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे...ज्या भक्तांना अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेणं शक्य होत नाही, अशा भाविकांसाठी संस्थानाने खास सोय केलीय...भक्तांसाठी महाप्रसाद ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आलीय... त्यामुळे राज्यभरातील आणि देशभरात असणाऱ्या स्वामी समर्थ भक्तांना आता घरबसल्या महाप्रसाद ऑनलाईन बुक करता येणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -