Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज?

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज?

2 Oct 2023, 11:51 वाजता

शौमिका महाडिक कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात?

 

Kolhapur Shoumika Mahadik : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार का याचीच चर्चा सध्या कोल्हापुरात रंगतेय.. निमित्त ठरलंय ते गणेशोत्सवानिमित्त शौमिक महाडिक यांच्या लागलेल्या पोस्टरचं... शौमिका महाडिक यांच्या फोटोवर दिल्ली अब दूर नही अशी टॅगलाईन लिहिण्यात आली होती. शौमिका महाडिक या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आहेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 11:10 वाजता

शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा?

 

Crop Loan Policy Changed : पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारने बदल केल्याने शेतक-यांचा हिरमोड झालाय... 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतक-यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदराची योजना सुरू केली होती...मात्र, शासनाने अचानक या योजनेत आता बदल केल्याने शेतकरी हवालदिल झालेयत...बदललेल्या निर्णयामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार आहे...ही 6 टक्के रक्कम शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून देणार असल्याचं नव्या परिपत्रकात सांगण्यात आलंय...मात्र, सूट द्यायचीच आहे तर मग सुरुवातीला पैसे शेतक-यांकडून घेता तरी कशाला...? शासन खरंच हे पैसे देणार आहे का...? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेयत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 11:02 वाजता

भरधाव ट्रकनं 10 जणांचा चिरडलं, 4 ठार, 6 गंभीर जखमी

 

Buldhana Accident : बुलढाण्याच्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालाय...भरधाव आयशर ट्रक झोपडीत घुसल्याने झोपलेल्या 10 मजुरांना चिरडलंय...या अपघातात 4 मजूर ठार झालेयत...तर 6 जण गंभीर जखमी झालेय...नांदुरा तालुक्यातील वडनेर इथे ही घटना घडलीय...सगळे मजूर हे महामार्गाच्या कामासाठी आले होते...ते झोपलेले असताना हा अपघात घडलाय...जखमींवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार  सुरू असून, अपघाताची चौकशी सुरू आहे...

बातमी पाहा - बुलढाण्यात झोपडीत घुसला भरधाव ट्रक; चार मजुरांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 10:28 वाजता

नाशिकमध्ये लेझरचा 6 जणांच्या दृष्टीवर परिणाम

 

Nashik Laser Light : नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीतल्या लेझर लाईटमुळे सहा तरुणांच्या दृष्टीवर कायमचा परिणाम झालाय.. या सहा जणांची दृष्टी परत येण्याची शक्यता नसल्यात जमा आहे... गणपती विसर्जन मिरवणुकीतला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बीसोबत लेझर लाईट्स लावण्यात येतात. प्रखर प्रकाशझोतांच्या लेझरमुळे डोळ्यांना दुखापत होते. थोड्या वेळासाठी नजर अंधुक होते.   काहीवेळा डोळ्यांचा पडदा जळू शकतो. तेव्हा विसर्जन मिरवणुकीची मजा घेताना डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 10:24 वाजता

मुंबईत ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला भाजप सुरुंग लावणार?

 

Shivsena Vs BJP : भाजपने लोकसभेसाठी मिशन 45 प्लसचं लक्ष्य ठेवलंय.. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत.. त्यासाठी मुंबईतही भाजपने विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलीय.. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याची तयारी भाजपने सुरु केलीय.  दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात ठाकरेंचे अरविंद सावंत यांच्या विरोधात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय... वरळी, भायखळा, शिवडी, मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघासाठी रणनीती आखण्यात आलीय.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -

2 Oct 2023, 09:43 वाजता

लालबाग राजा चरणी भाविकांचे भरभरुन दान

 

Lalbaugh Raja Donation : लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भाविकांकडून भरभरुन दान आलंय...10 दिवसांत राजाच्या दानपेटीत साडे तीन किलो सोने, 64 किलो चांदी आणि 5 कोटी 16 लाखांची रोख रक्कम भाविकांनी दानपेटीत टाकलीय...यावेळी एका भक्ताकडून लालबागच्या राजाला इलेक्ट्रिक बाईक अर्पण करण्यात आलीय...सध्या या सर्व वस्तूंचा लिलाव सुरू असून, भाविकांनी वस्तू घेण्यासाठी गर्दी केलीय...जवळपास एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोना चांदीचे मोदक, सीजन क्रिकेट बॅट, सोन्याचा मुलामा दिलेला चांदीच मुकूट भक्तांनी अर्पण केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 09:17 वाजता

सुमन पाटील, रोहित पाटील यांचं बेमुदत उपोषण

 

Sangli Suman Patil & Rohit Patil : दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमन  पाटील आजपासून बेमुदत उपोषणावर बसणार आहेत.. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रोहित पाटीलसुद्धा उपोषणावर बसतील.. सांगलीतल्या 17 गावांचा टेंभू सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी त्यांनी केलीय.. प्रस्ताव मंजूर असतानाही तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या 17 गावांचा समावेस टेंभू योजनेत करण्यात येत नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. तेव्हा या गावांचा समावेश टेंभू योजनेत होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सुमन आणि रोहित पाटील यांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 08:23 वाजता

जुन्नरमध्ये शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार?

 

Sharad Pawar : जुन्नरमध्ये शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अतुल बेनके सध्या अजित पवार गटात आहेत.. त्यामुळेच शरद पवार या ठिकाणी नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे. त्यातच शरद पवारांनी काल जुन्नरमधले काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचीही भेट घेतली.. युवक काँग्रेसच्या माध्यमातून सत्यशील शेरकर हे शेतक-यांचे तसंच युवकांचे प्रश्न सोडवत असतात.. विधानसभा निवडणुकीसाठी सत्यशील शेरकर यांचं नाव आघाडीवर आहे.. त्यामुळे शरद पवार आणि शेरकरांच्या भेटीनंतर पवार जुन्नरमध्ये नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत का याची जोरदार चर्चा सुरु आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 08:21 वाजता

गुन्हेगारांसाठी निवडणूक कठीण?

 

Election Commission : निवडणुकीत गुन्हेगारांना तिकीट का दिलं हे आता जाहीर करावं लागणार आहे... उमेदवार आणि राजकीय पक्षांनाही निवडणुकीआधी मतदारांना उमेदवारांचा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगावा लागणार आहे... गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे मोठं पाऊल उचललंय... तिकीट दिलेल्या उमेदवारांच्या  गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावा लागणार आहे.. राजस्थान निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतलाय.. तसंच राजस्थान निवडणुकीपासून यंदा पहिल्यांदाच घरातूनही मतदान करता येणार आहेत.. वृद्ध नागरिक तसंच 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येईल.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Oct 2023, 08:16 वाजता

कंत्राटी तहसीलदार नियुक्ती आदेश मागे

 

Jalgaon Zee 24 Taas Impact : झी 24 तासवर बातमी दाखवताच कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश मागे घेण्यात आलेयत... खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीच ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिलेयत...जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती...ही बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही कंत्राटी तहसीलदार नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केली...झी 24 तासने ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर महसूलमंत्र्यांनी ही जाहिरात तत्काळ रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिका-यांना दिल्यायत...तसंच याबाबत सविस्तर खुलासाही मागवलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -