Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Sep 2023, 22:22 वाजता

उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

 

Jalana Uddhav Thackeray : हे निर्घृण सरकार आहे. आंदोलक म्हणजे आतंकवादी नाहीत, वेळ पडल्यास आंदोलकांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा करेन असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलाय. जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. त्यांनी अंतरवाली सराटीत आंदोलकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस किली. तर अशोक चव्हाणांनीही मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 22:19 वाजता

सोमवारी संभाजीनगर बंदची हाक

 

Sambhajinagar Close : जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदची हाक देण्यात आलीय... सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.. मराठा क्रांती मोर्चाकडून छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागातही बंद पाळण्यात येणार आहे.. तोडफोड न करता आंदोलन करा असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या विनोद पाटील यांनी केलंय..

2 Sep 2023, 22:18 वाजता

भारत वि. पाकिस्तान मॅच पावसामुळं रद्द

 

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान मॅच पावसामुळे रद्द झालीय. दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या मॅचध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल स्वस्तात आऊट झाल्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पांड्यांनं डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 138 रन्सची पार्टनरशीप केली. ईशाननं 82 तर हार्दिक पांड्यानं 87 रन्स केले. या दोघांच्या कामगिरीमुळेच भारत 266 रन्सपर्यंत मजल मारू शकला. मात्र पावसामुळे पाकिस्तानची इनिंगच होऊ शकली नाही. त्यामुळे मॅच रद्द करण्यात आली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 21:14 वाजता

जालन्यातील लाठीचार्ज दुर्दैवी घटना - शिंदे

 

Chief Minister Eknath Shinde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलीय. जालन्यातील लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असंही एकनाथ शिंदेंनी म्हंटलंय. मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय. 

बातमी पाहा - 'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 19:39 वाजता

वन नेशन, वन इलेक्शनसाठी 8 सदस्यीय उच्चस्तरीय समिती

 

One Nation One Election Committee : वन नेशन, वन इलेक्शनसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करण्यात आलीय.. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही 8 सदस्यीय समिती नेमण्यात आलीय... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझादांचा या समितीत समावेश आहे. त्याशिवाय ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे, १५ व्या वित्त आयोगाचे माजी चेअरमन एन. के. सिंह,  लोकसभा सचिवालयाचे माजी सचिव सुभाष कश्यप, माजी मुख्य दक्षता अधिकारी संजय कोठारीही समितीत असणार आहेत... केंद्रीय विधी राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि विधी खात्याचे सचिव नितीन चंद्रा हे समितीत विशेष निमंत्रित असतील...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 19:14 वाजता

मुंबईत रविवारी मराठा संघटनांचं आंदोलन

 

Mumbai Maratha Protest : जालन्यातील लाठीचार्जचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय. दादरमधल्या हुतात्मा कोतवाल उद्यान इथं सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणारंय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतर मुंबईमध्ये विभागवार आंदोलन केली जाणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 18:10 वाजता

शरद पवारांचा राज्य सरकारकडे रोख

 

Sharad Pawar On Jalana Lathicharge : जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा सवाल करत शरद पवारांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला असा आरोपही पवारांनी केलाय. तर दुसरीकडे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र आणि राज्याने पुढाकार घ्यावा. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता तोडगा काढावा, राष्ट्रवादीचं सहकार्य राहिल अशीही स्पष्ट भूमिका शरद पवारांनी जाहीर केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 17:40 वाजता

सुधीर मुनगंटीवारांच्या ताफ्याला काळे झेंडे

 

Sudhir Mungantiwar Black Flag : जालनामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झालाय.. हिंगोलीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले.. औंढावरुन नांदेडकडे सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.. तेव्हा काळे झेंडे दाखवत जालन्यातल्या घटनेचा निषेध करण्यात आला.. याआधी औंढामध्येही सुधीर मुनगंटीवार यांना घेराव घालण्यात आला होता...शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज का करण्यात आला असा सवाल यावेळी मराठा बांधवांनी सुधीर मुनगंटीवारांना केला..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 17:29 वाजता

रविवारी बुलढाणा बंदची हाक

 

Buldhana Protest : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी मराठा संघटना आक्रमक झाल्यायेत. बुलढाणा जिल्ह्यात या घटनेच्या निषेधार्थ उद्या बंदची हाक देण्यात आलीये.. त्याचवेळी बुलढाणा शहरात मुख्यमंत्र्यांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे.. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं आवाहन सकल मराठा समाजानं केलंय. त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द करायची मागणी सकल मराठा समाजानं केलीये. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 17:13 वाजता

राज्यात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचे

 

Maharashtra Rain Prediction : राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी.. कारण जवळपास पूर्ण ऑगस्ट महिना दडी मारलेला पाऊस आजपासून सक्रीय होतोय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात उद्यापासून पुढचे 3 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह, विदर्भ, मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात 3, 4 आणि 5 सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. सोबतच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -