Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Sep 2023, 13:09 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'एका व्यक्तीविरोधात आमचं आंदोलन नाही' ,'आज संध्याकाळी जालन्यामध्ये जाणार', 'मुंबई, इंडिया एकत्र करून दाखवली', 'सरकारचं कुणीही जालन्यात गेलं नाही', 'आंदोलन सुरू आहे हे माहिती नव्हतं का?','आमच्या आघाडीनं विरोधकांच्या पोटात गोळा', 'कसली सखोल चौकशी करणार आहात?', 'एक फूल दोन हाफला आंदोलनाची माहिती नाही का?', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल.

2 Sep 2023, 13:05 वाजता

जाफ्राबादमध्ये मराठा आंदोलन पेटलं

 

Jafrabad Maratha Andolan : जाफ्राबाद मध्ये मराठा आंदोलन पेटलंय आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळपोळ केलीये.. रस्त्यावर टायर जाळून जालन्यातील मारहाणीचा निषेध करण्यात आला.. पोलिसांनी केलेल्या मारहानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Sep 2023, 12:39 वाजता

बदनापूरमध्ये मराठा आंदोलकांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवली

 

Jalna Maratha Andolan Update : जालना बदनापूरमधील मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलंय. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवलीय...मराठा आंदोलकांना मारहाण केल्याने बदनापुरात कडकडीत बंद आहे...यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केलीय...यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील वाहतूक ठप्प झालीय...

2 Sep 2023, 12:29 वाजता

जालन्यात पोलिसांचा हवेत गोळीबार

 

Jalna Maratha Andolan Update : जालना शहरात पुन्हा आंदोलन चिघळलंय. अंबड चौफुली भागात आंदोलन पेटलंय. आंदोलकांनी पुन्हा जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही जाळपोळ केलीय. पोलिसांनी वातावरण निवळण्यासाठी हवेत गोळीबार केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

2 Sep 2023, 12:18 वाजता

जालन्याच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांची शिंदेंसोबत चर्चा- सूत्र

 

Jalna Maratha Andolan Update : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कालच्या जालन्याच्या घटनेबाबत चर्चा केली...यानंतर फडणवीसांनी लाठीचार्ज करण्यासाठी जबाबदार कोण याची चौकशी करा असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालकांना दिलेयत. अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

2 Sep 2023, 11:38 वाजता

उद्धव ठाकरे घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट

 

Uddhav Thackeray on Jalna Maratha Andolan  : उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालन्याला जाणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ते विमानाने रवाना होणार आहेत. अंबड आणि आंतरवाली सराटी या गावांना भेट देऊन ते आंदोलकांची भेट घेतील. पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांचीही ते विचारपूस करणार आहेत. शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्यांचीही ते भेट घेतील.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

2 Sep 2023, 11:05 वाजता

आदित्य L1चं आज प्रक्षेपण होणार

 

Aditya L1 : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल... पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

2 Sep 2023, 10:13 वाजता

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक

 

Maratha Kranti Morcha meeting today in Mumbai : जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांना मारहाण केल्यानं मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालीय...मराठा क्रांती मोर्चाने सरकारचा निषेध केलाय...आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मुंबई तातडीची बैठक बोलावलीय...दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात ही बैठक होणार आहे...त्यामुळे पुन्हा मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे...

2 Sep 2023, 10:01 वाजता

जालन्यात पोलिसांकडून बळाचा गैरवापर झाला- अजित पवार

 

Ajit Pawar on Jalna Maratha Andolan : पोलिसांकडून बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आंदोलकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Sep 2023, 09:34 वाजता

संभाजीराजेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

 

Sambhaji Raj met the Maratha protesters in Jalna : संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनस्थळी भेट दिली...यावेळी संभाजीराजेंनी आंदोलनकर्त्यांची चर्चा केली आणि मारहाणीबद्दल घटनेची माहिती जाणून घेतली.