Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Sep 2023, 09:02 वाजता

धुळे-सोलापूर महामार्गावरील सर्व बस गाड्या रद्द 

 

Jalna Maratha Andolan Update : धुळे सोलापूर महामार्गावरील सर्व बस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने सर्व बस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. एसटी महामंडळाच्या बस गाड्या जाळल्यामुळे सोलापूर हायवेवरील बस गाड्या बंद. औरंगाबादवरून बीड सोलापूर उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक प्रवासी सिडको बस स्थानकात अडकले. गाड्या रद्द केल्यामुळे सिडको बस स्थानकात गाड्यांचीही गर्दी झालीये. आज दिवसभर गाड्या बंद राहणार.

2 Sep 2023, 08:56 वाजता

मराठा समाजाकडून बीड बंदची हाक

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवरती झालेल्या लाठीचार्ज नंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. सकाळपासूनच बीड शहरामध्ये रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झालेला आहे. प्रशासनाच्या वतीने सर्वांना शांततेचं आव्हान करण्यात आलेला आहे. 

2 Sep 2023, 08:55 वाजता

परभणीत बस डेपोमधून वाहतूक बंद

जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी रात्री परभणी येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज मानवत आणि पाथरी शहर बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. तालुका स्तरावर आंदोलन आखणी केली जात आहे. तर परभणी शहरातील खानापूर फाटा येथे एका बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे परभणी परिवहन विभागातील सातही बस डेपोमधून बस सकाळ पासून बंद ठेवण्यात आल्याची माहिती परभणी परिवहन विभाग प्रमुख बी एस डफले यांनी दिली.

2 Sep 2023, 08:55 वाजता

Vijay Wadettiwar Live | Marathi News LIVE Today : 'सरकारनं घटनेची चौकशी करावी', 'लाठीमाराची घटना सरकार पुरस्कृत', 'गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा', विजय वडेट्टीवार यांची मागणी

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

2 Sep 2023, 08:30 वाजता

मराठा क्रांती मोर्चाची बीड बंदची हाक

 

Beed Maratha Kranti Morcha : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Sep 2023, 08:00 वाजता

जालन्यात शरद पवार घेणार मराठा आंदोलकांची भेट 

 

Sharad Pawar : शरद पवार थोड्याच वेळात जालन्याला रवाना होणार. जालन्यात शरद पवार घेणार मराठा आंदोलकांची भेट.  अंतरावली सराटी गावात पवार भेट देणार. आंदोलकांना पवार करणार शांततेचं आवाहन

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Sep 2023, 07:33 वाजता

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम 

 

Jalna Maratha Andolan Update : उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. आता जीव गेला तरी माघार नाही. मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलीय. रात्री पुन्हा 11.30 वाजल्यापासून सगळेजण उपोषणाला बसलेयत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Sep 2023, 07:24 वाजता

जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

 

Jalna Maratha Andolan : जालन्याच्या अंतरावली सराटी इथे काल मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मात्र आज परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी तुफान जाळपोळ केली. आंदोलकांनी 15 बसगाड्या जाळल्या. आंदोलकांच्या दगडफेकीत 5 अधिकारी आणि 32 पोलीस कर्मचारी जखमी झाले. रात्रीच्या तणावानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. जाळलेली वाहनं पोलिसांनी दूर करून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सुरू केलाय. काल आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीमार केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखर करण्याची आवश्यकता होती. त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी पोलीस गेले असता आंदोलकांनी त्यांनी अडवलं आणि दगडफेक केली, त्यातून लाठीमार झाला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.