Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Sep 2023, 16:54 वाजता

मुंबई एअरपोर्टवर टॅक्सीचालकांची गुंडगिरी

 

Mumbai Airport Rada : मुंबई एअरपोर्टवर टॅक्सीचालकांनी गुंडगिरी करत राडा घातला. जी २० साठी लागू करण्यात आलेल्या सुरक्षा नियमांमुळे टॅक्सीचालक नाराज झाले. टॅक्सीचालकांनी महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण केलीय. महिला सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झालीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - मुंबई विमानतळावर टॅक्सी चालकांची गुंडगिरी; महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण

2 Sep 2023, 16:17 वाजता

जालना आंदोलनात आतापर्यंत 64 जखमी

 

Jalana Police Injured : जालन्यातील आंदोलनात आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत. यात 57 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. या 57 पैकी 19 महिला कर्माचारी आहे. 20 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येतंय. तर या आंदोलनात आतापर्यंत 7 नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचं उपोषण आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला. त्याचं रूपांतर दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये झालं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Sep 2023, 15:21 वाजता

Udayanraje Bhosale Live | Marathi News LIVE Today :  'पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध', 'जखमींच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी', 'मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा', 'लाठीचार्जची न्यायलयीन चौकशी करा', उदनराजेंची राज्य सरकारकडे मागणी. 'इतर समाजाला न्याय मग मराठा समाजाला का नाही?', 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काल चर्चा केली', 'मराठा समाजाला न्याय का मिळत नाही', उदयनराजेंचा सवाल. 'शांततेत आंदोलन चालू ठेवावं', उदयनराजे भोसलेंचं आवाहन. 'आतापर्यंत मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार नाही', 'शांततेत आंदोलन चालू ठेवावं',उदयनराजे भोसलेंचं आवाहन. 'आतापर्यंत मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार नाही', 'मराठ्यांनी 57 मोर्चे काढले, सर्व मोर्च शांततेत','सर्वांनी एकत्र बसून आरक्षणावर तोडगा काढवा' उदयनराजे यांचं वक्तव्य

2 Sep 2023, 15:17 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आंदोलनात बळाचा वापर करण्याची गरज नव्हती', 'पोलिसांनी लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती', 'मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही घेतला होता', 'संभाजीराजे, उदयनराजे याठिकाणी आले याचा आनंद', 'मराठा आंदोलन बदनाम होणार नाही याची काळजी घ्या', शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल.

2 Sep 2023, 15:04 वाजता

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कालची घटना अत्यंत दुर्दैवी' ,'सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही', 'आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करू', 'मोठ्या प्रमाणावर पोलीस या ठिकाणी आणले गेले', 'एका बाजूने चर्चा तर दुसरीकडे पोलीस उतरवले',  'रुग्णालयात जखमींची भेट घेतली त्यांना छर्रे मारलेत', 'आंदोलकांनी कोणतीही कायदा हातात घेतला नाही', शरद पवार यांची माहिती.

2 Sep 2023, 14:52 वाजता

 सरकारला जाती-पातीवरून दंगली घडवायच्या आहेत- संजय राऊत

 

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लाठीचार्जवरून सरकारवर निशाणा साधलाय. सरकारला जाती-पातीवरून दंगली घडवायच्या आहेत. याचीच ही ठिणगी जालन्यात पडल्याचं राऊतांनी म्हटलंय.तर मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीवरील लक्ष हटवण्यासाठी हा लाठीहल्ला झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय...या प्रकरणात सरकारच दोषी असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय..

2 Sep 2023, 14:04 वाजता

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

 

Jalna Maratha Andolan Update : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू,दावलवाडी फाट्याजवळ आंदोलन सुरू,आंदोलक झाले आक्रमक, रस्त्यावर येऊन आंदोलकांचं आंदोलन

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

2 Sep 2023, 13:31 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today :  'गॅस स्वस्त झाल्या डाळी महागल्या', 'गॅस स्वस्त केला पण शिजवायचं का?', 'शिवसेना भाड्यावर चालत नाही निष्टेवर चालते',  'भाजप म्हणजे भाड्याने जमावलेला पक्ष','लोकांचा सरकारवरील विश्वास उडालाय', 'प्रधानमंत्री आभास योजनांचा काळ सुरु झालाय', 'शिवसेना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी काढली नाही', 'बाळासाहेबांनी भाजपसोबत जाण्यासाठी पक्ष काढाला नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.

2 Sep 2023, 13:23 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today :  'हुकूमशाहा देशात जन्माला येऊच द्याचा नाहीये', 'हुकूमशाहीला चिरडण्यासाठी इंडिया आघाडी','कुटुंब व्यवस्था नाकारणाऱ्यांनी घराणेशाहीवर बोलू नये','जालन्यात कार्यक्रम घेण्यासाठी आंदोलन मोडीत', 'हे सरकार खोक्यातून जन्माला आलंय', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला टोला.'खरंच तुम्हाला योजनांचा लाभ मिळालाय का?','कर्नाटकात बजरंगबलीचा नारा देऊन भाजप हारलं', उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.

 

2 Sep 2023, 13:16 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'आंदोलनकर्त्यांना भेटायला मंत्र्यांना वेळ नाही', 'सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी', 'तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागू शकता का?', 'आदेशानंतर आंदोलकांवर लाठीमार', 'आता फक्त चौकशीचा फार्स', 'बारसूमध्ये असाच लाठीमार केला', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. 'गणपतीत विशेष अधिवेशन कशाला?', 'सोयीप्रमाणे संसदेत निर्णय बदलले जातायत', 'मणिपूरवर बोलायला सरकारला वेळ नाही', 'विशेष अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा', उद्धव ठाकरेंचा  केंद्र सरकारला टोला.