4 Dec 2023, 20:01 वाजता
सुनेत्रा अजित पवार बारामतीच्या भावी खासदार? मंत्रालय परिसरात पोस्टर
Sunetra Pawar MP Banner : सुनेत्रा अजित पवार यांची बारामतीच्या भावी खासदार म्हणून मुंबईत पोस्टर्स लागलीत. मंत्रालय परिसरात ही पोस्टर्स लावण्यात आलीत. राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती... त्यानंतर मुंबईत ही पोस्टरबाजी सुरू झालीय. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात वहिनी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा यानिमित्तानं पुन्हा रंगलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 17:32 वाजता
सागरी सामर्थ्य ही छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी- मोदी
Prime Minister Modi in Sindhudurga : नौदलातील पदांची नावं भारतीय परंपरेनुसार बदलणार असल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय... सिंधुदुर्गात आयोजित नौदल कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. जिथं नौदलाचा जन्म झाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत नौदल दिन साजरा होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. नौदलाच्या राजमुद्रेत शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जपण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
4 Dec 2023, 17:19 वाजता
नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
Prime Minister Modi in Sindhudurga : पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनाच्या निमित्तानं कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर तारकर्लीमधे होणाऱ्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 16:19 वाजता
मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण
Prime Minister Modi in Sindhudurga : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात दाखल. नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी कोकणात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिराला मोदींनी दिली भेट.. शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर ते तारकर्लीमधे होणाऱ्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. यावेळी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील.
4 Dec 2023, 14:10 वाजता
लक्ष्मण हाकेंचा मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा
Laxman Hake : मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्यांनी राजीनामा दिलाय. मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिलाय. वैचारिक मतभेदामुळे राजीनामा दिल्याचं पत्र हाकेंनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना पाठवलंय. दोन महिन्यात मागासवर्ग आयोगाच्या चार सदस्यांनी राजीनामे दिलेत. बालाजी किल्लारीकर, लक्ष्मण हाके, बबनराव तायडे आणि संजय सोनवणे यांनी राजीनामा दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 13:54 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना कानमंत्र
Prime Minister Narendra Modi : संसदेचं हिवाली अधिवेशन आजपासून सुरु झांलय.. हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.. यावेळी त्यांनी विरोधकांना कानमंत्रही दिला.. पराभवाचा राग विरोधकांनी काढू नका...नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मक व्हा, असा सल्ला मोदींनी विरोधकांना दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 13:50 वाजता
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik In Rajyasabha : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडण्यात आला... अवकाली पावसानं शेतीच्या झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केलाय. त्याला लवकरच मंजुरी द्यावी आणि शेतक-यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केलीये.. राज्यातील 96 तालुक्यांत अवकाळी पावसानं शेतीच मोठं नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 12:52 वाजता
बीडमध्ये आढळल्या सर्वाधिक कुणबी नोंदी
Beed Kunbi Proof : मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्यात.. जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजारांहून अधिक नोंदी सापडल्याच दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय. यातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात आलंय.. आठ दिवसापूर्वी बीडमध्ये दहा हजार नोंदी सापडल्या होत्या त्यानंतर आठ दिवसांच्या तपासणीत पुन्हा 3000 हून अधिक नोंदी मिळाल्यात. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कुणबी नोंदींचा आकडा 13 हजारांच्या पुढे गेलाय.. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 12:49 वाजता
तेलंगणात हवाई दलाचं विमान कोसळलं
Telangana IAF Plane Crash : तेलंगणामध्ये हवाई दलाचं विमान कोसळून दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झालाय. दिंडीगुलच्या एअर फोर्स अकॅडमीमध्ये हा प्रकार घडलाय. प्रशिक्षण सुरू असताना सकाळी 8 वाजून 55 मिनिटाला विमान कोसळलं. पिलॉट्स ट्रेनर एअरक्राफ्टने उड्डान घेतल्यानंतर ते कोसळलं. त्यानंतर विमानाला आग लागली. यात प्रशिक्षण घेत असलेल्या दोन्ही पायलटाच मृत्यू झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 12:45 वाजता
सिनेट,पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची रणनीती
BJP New Slogan : सिनेट, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलीय...मुंबई आमचीच" म्हणत भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय...निवडणूक जिंकण्यासाठी "मुंबई आमचीच" नावाचा विशेष कक्ष भाजपने स्थापन केलाय...भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणुका जिंकण्यासाठी ही रणनीती आखलीय...निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -