4 Dec 2023, 12:01 वाजता
गिरीश महाजन यांनी दिलेला शब्द पाळावा - मनोज जरांगे
Manoj Jarange On Girish Mahajan : जळगावातल्या सभेपूर्वी जरांगेंनी गिरीश महाजांना इशारा दिलाय.. 'मराठा समाजाला नडण्याचं काम करु नये' महाजनांनी दिलेला शब्द पाळावा असं म्हणत जर शब्द पाळला नाही तर रेकॉर्डिंग व्हायरल करु असा इशारा जरांगेंनी दिलाय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 11:38 वाजता
काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
Congress : 4 राज्यातील निकालामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय...काँग्रेसला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा होती...मात्र, अपेक्षित बहुमत न मिळाल्याने इंडिया आघाडीत काँग्रेस पक्षाचं महत्व कमी होऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिलीय...राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लोकसभा जागा वाटपात वरचढ ठरू शकतात...यामुळे निकालामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्येही चलबिचल असल्याचं सूत्रांनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 11:27 वाजता
अवकाळीमुळं मिरची उत्पादक संकटात
Nandurbar Chilly Crop : नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय...मिरची पिकावर चुरडा मुरडा आणि डावणी या रोगांचा प्रादुर्भाव झालाय...रोगांमुळे मिरचीचा आकार बदलतोय... झाड मरण्याचे प्रमाण अधिक आहे...त्यामुळे मिरचीचं पोषण होत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यताय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 10:43 वाजता
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
Gold Price Hike : सोन्याच्या दरातही विक्रमी वाढ झालीये.. वायदा बाजारात सोन्याला प्रति तोळा 64 हजारांचा दर मिळतोय..शुक्रवारच्या तुलनेत तोळ्यामागे सोन्याचे दर 580 रुपयांनी वाढलेत.. लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालीये.. तसंच डॉलरच्या किंमतीचाही सोन्यावर परिणाम झालाय.... सोन्याचे दर आणखी वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 10:15 वाजता
पुण्यात भोंदूबाबाचा तरुणाला गंडा
Pune Superstition : पैसे पाडण्याचं आमिष दाखवत भोंदूबाबाने तरूणाला 18 लाख रुपयांना गंडा घातलाय...पुण्याच्या हडपसर परिसरात ही घटना घडलीये...भोंदूबाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चौघांनी विनोद परदेशीला लुटलं....विनेदला मित्रामार्फत पैशाचा पाऊस पाडण्याचं सांगत 18 लाख रुपये ठेवून पूजा मांडायला लावली...पूजेच्या ठिकाणी तोतया पोलिसांनी धाड मारत तरूणाला मारहाण केली...आणि 18 लाखांसह भोंदूबाबाला घेऊन पोबारा केला...या प्रकरणी फसवणूक झालेल्या विनोदने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस भोंदूबाबासह तिघांचा शोध घेत आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 10:09 वाजता
हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?
State Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...या विस्तारात राहिलेल्या मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे...मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे...विस्तारात अजित पवार यांच्या गटाकडून सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे...अशी माहिती सूत्रांनी दिलीय...लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाण्याआधी विस्तार झाला तर कार्यकर्त्यांमध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो...त्यामुळं विस्तार व्हावा अशी अनेक आमदारांची वरिष्ठांकडे मागणी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 09:51 वाजता
'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा धोका
Cyclone Michaung : 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय... बंगालच्या उपसागरात आज हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे... हे वादळ उद्या आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणारेय. यावेळी वा-याचा वेग ताशी 100 किलोमीटर राहू शकतो. चक्रीवादळामुळे तामिळनाडू सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. तसंच रेल्वेनं 188 गाड्याही रद्द केल्यात... वादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय... चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 पथकं तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 09:30 वाजता
एल निनोमुळे भारतावर दुष्काळाचं सावट?
El Nino : वारंवार येणा-या एल निनोचा मोठा फटका भारताला बसणार आहे.. एल निनोच्या प्रभावामुळे देशावर दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता आहे.. तसंच यंदा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे.. एल निनोच्या प्रभावामुळे पुढच्या वर्षी पावसाच्या प्रमाणातही कमालीची घट होणार आहे.. मान्सूनच्या आगमनाला एल निनोचा अडथळा निर्माण होणार असल्यानं पिकांसाठी अपेक्षीत गारवा मिळणार नाही.. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ महागाई वाढण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 08:56 वाजता
विधानसभेत जिंकलेल्या खासदारांसमोर पेच
BJP MP Membership May be Cancelled : विधानसभा निवडणुका लढवून त्यात विजय मिळवणा-या खासदारांना येत्या 14 दिवसांत विधानसभा की संसदेचे सदस्यत्व कायम ठेवायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे...तसा निर्णय न घेतल्यास त्यांचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते....भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांच्यासह 21 खासदारांना विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरविलं होतं...राज्यघटनेच्या कलम 101 मधील तरतुदीनुसार कोणताही लोकप्रतिनिधी एकाच वेळी दोन सभागृहांचा सदस्य असू शकत नाही...त्याने दोनपैकी एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा तसे न केल्यास त्या लोकप्रतिनिधीचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते...संसद सदस्यत्व रद्द झालेली व्यक्ती विधानसभेचा सदस्य म्हणून कार्यरत राहू शकते...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
4 Dec 2023, 08:14 वाजता
अर्ज न केलेल्या शिक्षकांना बदलीची संधी
Teacher Transfer : अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी मिळणार आहे...जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरू झालाय...2022 साली अर्ज केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करता येणारे...ग्रामविकास विभागाने तसा नवीन आदेश काढलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -