7 Oct 2023, 23:18 वाजता
शिवसेना-भाजपातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार?
State cabinet expansion soon : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार होणार आहे. घटनस्थापना झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय.शिवसेना-भाजपातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळतेय, त्याजागी 2 नवीन मंत्र्यांचा समावेश होणार असल्याचं समजतंय.. शिवसेना-भाजपचा 6/8 चा फॉर्म्युला तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Oct 2023, 22:24 वाजता
टोस्ट, खारी स्वस्त होणार, जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर
GST on Toast-Khare : टोस्ट आणि खारी आता स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारनं टोस्ट खारीवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय़ घेतलाय. टोस्ट खारीवर आता 12 टक्क्यांवरून 5 टक्के जीएसटी करण्यात आलाय. त्यामुळे टोस्ट खारीचे भाव कमी होणार आहेत. दिल्लीतल्या जीएसटी बैठकीनंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिलीय. काही नियोजित कारणांमुळे अर्थमंत्री अजित पवार दिल्लीतल्या बैठकीला हजेरी लावू शकले नाहीत असं केसरकरांनी सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Oct 2023, 19:03 वाजता
शिवसेना आमदार संजय शिरसाटांना समज देण्याची शक्यता- सूत्र
Sanjay Shirsat Statement : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे कान टोचले जाण्याची शक्यता आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावं असं विधान संजय शिरसाट यांनी केलं होतं. शिरसाट यांच्या विधानामुळे महायुतीतील नेते नाराज आहेत. त्यामुळेच महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिरसाटांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान फडणवीसांनी दिल्लीला जावं की राज्यात राहावं याबाबतचा निर्णय दिल्लीचं नेतृत्व घेईल, शिरसाटांनी औकातीत बोलावं असं भाजप नेते आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Oct 2023, 14:11 वाजता
Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सप्तश्रृंगी गडावर सुविधा देणार', '81 कोटी 86 लाखांचा तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर करणार', 'सोमवारी आराखडा मंजूर करणार', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा.
7 Oct 2023, 13:33 वाजता
देवेंद्र फडणवीस डमरु वाजवतात, 2 माकडे नाचतात- संजय राऊत
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या माकड टीकेवरुन राज्याचं राजकारण तापलंय... देवेंद्र फडणवीस हे मदारी आहेत. ते डमरु वाजवतात आणि दोन माकडं नाचतात अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.. त्यावरच आता भाजप आमदार नितेश राणेंनीही जोरदार पलटवार केलाय.. संजय राऊतांचे मदारी कोण हे त्यांनी स्पष्ट करावं असं आव्हान नितेश राणेंनी दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2023, 13:11 वाजता
राज्यात भाजपच ज्येष्ठ पक्ष, बॉस वगैरे नाही- चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule vs Ambadas Danve : राज्यात भाजपच ज्येष्ठ पक्ष आहे, मात्र बॉस वगैरे नाही असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय...यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय...यांचे सर्वांचे बॉस पातशाह केंद्रातच बसलेयत...त्यामुळे यांनी कितीही डराव डराव केले तरी केंद्राचं ऐकणार असा टोला दानवेंनी लगावलाय...
7 Oct 2023, 12:31 वाजता
नवाब मलिकांचा अजित पवारांना पाठिंबा?
Nawab Malik's support to Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. निवडणूक आयोगाच्या सुनावणी अजित पवार गटाने आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तो बेचाळीसावा आमदार कोण याचीच चर्चा सुरु झाली होती.. नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात सत्तेत असलेल्या अजित पवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चाही आहे. कालच अजित पवार गटाच्या समीर भुजबळांनीही मलिकांची भेट घेतली होती.. तेव्हा ते बेचाळीसावे आमदार नवाब मलिक असल्याचीच चर्चा आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2023, 12:20 वाजता
मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद
Mumbai Water : मालाड, गोरेगाव, कांदिवलीमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद राहणारेय. मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आऊटलेटवरील दहा झडपा नव्यानं बसवण्यात येणारेय.हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणारेय. त्यामुळे या काळात पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय.
7 Oct 2023, 11:37 वाजता
अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो
Ajit Pawar Banner : शरद पवारांनी अजित पवार गटाला फोटो वापरण्यास मनाई केल्यानं आता अजित पवार गटाने नवी खेळी केलीय...पवारांचे गुरू असलेले यशवतंराव चव्हाण यांचे फोटो अजित पवारांच्या बॅनरवर लावण्यात आलेयत...उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत...यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होल्डिंगवर यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आलेयत...शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं...त्यानंतर आता पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो नाशिकमधील बॅनरवर झळकलेयत...
बातमीचा व्हि़डीओ पाहा-
7 Oct 2023, 11:11 वाजता
नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला
Nashik Farmers : नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला. नाशिकमध्ये कांदा, टोमॅटो उत्पादत शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-