7 Oct 2023, 10:39 वाजता
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीची मुंबईत रेड
Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केलीय.. बॉलिवूडमधलं मोठं प्रोडक्शन हाऊस अशी ओळख असलेल्या कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर रेड टाकण्यात आलीय.. महादेव बेटिंग अॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे.. ईडीकडून आर्थिक तपशीलांबाबत माहिती घेतली जात आहे.. महेश मांजरेकर यांच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातही कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका आहे.. तर अनेक दिग्गज बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांसोबत कुरेशीचे फोटोसुद्धा पाहायला मिळतात.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2023, 10:24 वाजता
मालेगावमध्ये सिनेमागृहात फोडले फटाके
Malegaon Theater : नाशिकच्या मालेगावमध्ये शाहरुख खानच्या अतिउत्साही चाहत्यांनी सिनेमागृहात फटाके फोडून धुडगूस घातलाय...प्रेक्षकांनी सिनेमागृह भरलेला असतानाही सुतळी बॉम्बसारखे घातक फटाके फोडण्यात आले...शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा शेवटचा शो मालेगावच्या कमलदीप सिनेमागृहात पार पडला...त्यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी गर्दी केली होती...त्याचवेळी अतिउत्साही चाहत्यांनी फटाके फोडून गोंधळ घातला...याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी चार ते पाच संशयित चाहत्यांना ताब्यात घेतलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2023, 09:59 वाजता
Vijay Wadettiwar Live | Marathi News LIVE Today : 'शिवसेनेच्या 16 आमदारांवर कारवाई होणार','भ्रष्टाचारी मंत्र्यांना घरी जावंच लागेल', 'मुश्रीफांना पदावर राहण्याचा अधिकार नाही','राज्यात 3 लुटारुंच सरकार', 'राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी', 'कारवाईच्या भीतीनं वेळकाढूपणा सुरू', विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारला टोला.
7 Oct 2023, 09:30 वाजता
Chandrashekhar Bawankule Live | Marathi News LIVE Today : 'फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं','फडणवीसांबाबत भाजप कार्यकर्त्यांची इच्छा','राजकारणात काहीही होऊ शकतं','अजितदादांसोबत आलेल्यांना मोदींचं नेतृत्व मान्य','राज्यात बॉस वगैरे कोणी राहात नाही','आम्ही मित्रपक्षांना कधीही सोडणार नाही','विरोधकांना उमेदवारच भेटणार नाही','लोकसभेसाठी 45+चं भाजपचं टार्गेट','शिंदेंना रोजच जनतेचं समर्थन मिळतंय','निवडणुका जवळ येत जातील तसं अजितदादांना समर्थन वाढत जाईल','राज्यात आम्ही ज्येष्ठ मोठा भाऊ म्हणून सगळं करणार', चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान.
7 Oct 2023, 09:04 वाजता
मराठा आरक्षणासाठी हालचाली?
Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यायत...मराठा आरक्षण समिती 11 ऑक्टोबरपासून मराठवाडा दौ-यावर जाणार आहे...कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी समिती गठीत करण्यात आलीय...या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती सदस्यांसह 11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मराठवाडा दौ-यावर आहेत...या दौ-यादरम्यान ही समिती मराठवाड्यातील नागरिकांकडील उपलब्ध कागदपत्र तपासण्याचं काम करणार आहे...जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आलंय...यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे...
7 Oct 2023, 08:29 वाजता
नागपूर विमानतळावर 72 लाखांचं सोनं जप्त
Gold Seized at Nagpur Airport : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणा-या महिलेला अटक करण्यात आलीये. तिच्याकडून 72 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय.. या महिलेनं पेस्टच्या स्वरुपात बेल्टमध्ये हे सोनं लपवलं होतं.. शारजावरुन ही महिला नागपुरात आली.. त्यावेळी सीमाशुल्कविभागाच्या अधिका-यांनी तिला अटक केली.. तिची तापासणी केली असता तिच्याकडे 1.279 किलो सोनं आढळून आलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2023, 08:00 वाजता
आशियाई गेम्समध्ये भारताची 100 पदकांची कमाई
Asian Games : आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमने फायनलमध्ये धडक दिलीय.. फायनलमध्ये आता टीम इंडियाची गाठ अफगाणिस्तानसोबत पडेल. टीम इंडियानं सेमी फायनलमध्ये बांग्लादेशचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत बांग्लादेशला फक्त 96 रन्समध्येच गुंडाळलं.. 97 रन्सचं हे लक्ष्य कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा या जोडीनं 10 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. तिलक वर्माने नाबाद 55 तर कॅप्टन ऋतुराज गायकवाडने नाबाद 40 रन्सची खेळी साकारली.. तेव्हा अफगाणिस्तानला फायनलमध्ये लोळवत गोल्ड मेडल जिंका अशीच अपेक्षा आता क्रिकेट फॅन्स करतायत...
7 Oct 2023, 07:34 वाजता
आशियाई गेम्समध्ये तिरंदाजीत ओजस देवताळेची सुवर्ण कामगिरी
Asian Games : भारताच्या ओजस देवताळेने इतिहास रचलाय. आशियाई गेम्समध्ये तिरंदाजीत ओजस देवताळेने सुवर्ण पदक पटकावलं. आशियाई गेम्समध्ये तिसरं सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम त्याने केलाय. ओजसने तिरंदाजी कम्पाऊण्डमध्ये भारताच्या अभिषेक वर्माविरोधात विजय मिळवला. त्यामुळे या प्रकारात भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालं. ओजसने याआधी एशियन गेम्समध्ये टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाऊंडमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. ओजस आणि अभिषेकच्या या सुवर्ण आणि रौप्य मेडलमुळे भारताची मेडल टॅली 99 वर गेलीय. ओजसच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपूरमध्ये त्याच्या राहत्या घरी दिवाळी साजरी केली जातेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
7 Oct 2023, 06:58 वाजता
पुण्यात दारूच्या नशेत कारचालकानं अनेक वाहनांना उडवलं
Pune Accident : पुण्यातील झेड ब्रिज जवळ मोठा अपघात झालाय...नारायण पेठ परिसरात दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाने 3 ते 4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिली...यामध्ये 2 रिक्षांचा समावेश असून, अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 ते 4 जण जखमी झालेत.