9 Oct 2023, 20:18 वाजता
मुंबई-पुणे एक्स्प्रेस उद्या वाहतुकीसाठी बंद
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक उद्या दुपारी १२ ते २ बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी12 ते 2 बंद राहील. एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात ट्रॅफिक संदर्भातली गँट्री म्हणजेच लोखंडी कमान बसवण्यात येणार असल्यानं वाहतूक बंद राहणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 20:18 वाजता
मुंबई-पुणे एक्स्प्रेस उद्या वाहतुकीसाठी बंद
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक उद्या दुपारी १२ ते २ बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी12 ते 2 बंद राहील. एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात ट्रॅफिक संदर्भातली गँट्री म्हणजेच लोखंडी कमान बसवण्यात येणार असल्यानं वाहतूक बंद राहणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 19:51 वाजता
भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला
Bharat Gogawale meet Sunil Tatkare : .भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला गेले आहेत, राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही भेट झालीय. भेटीमागचं कारण गुलदस्त्यात.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 18:59 वाजता
मुंबई हायकोर्टाचा एकनाथ खडसेंना दणका
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीय... पुणे भोसरी येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीनं देखील गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाली होती... ईडीनं नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी याचिका खडसेंनी केली होती... मात्र मुंबई हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली... त्यामुळं खडसेंवरील ईडी कारवाई सुरूच राहणाराय... खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 18:00 वाजता
काँग्रेसप्रणित राज्यांत जातनिहाय जनगणना- राहुल गांधी
Rahul Gandhi : काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलीय... सत्तेवर आल्यास देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीनं घेतलाय, असंही त्यांनी जाहीर केलं. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत आज जातनिहाय जनगणनेवर व्यापक चर्चा करण्यात आली. काँग्रेसची सत्ता असलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचं ठरवलंय, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
9 Oct 2023, 17:25 वाजता
शिवाजी पार्क न मिळाल्यास कोर्टात धाव घेणार- अनिल परब
Thackeray Group on Dasara Melava : सालाबादप्रमाणं यंदाही शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा व्हावा, यासाठी शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतलीय. शिवाजी पार्क न मिळाल्यास कोर्टात धाव घेणार, असा इशारा आमदार अनिल परबांनी दिलाय... परवानगीवरून मुंबई महापालिकेकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय... शिवसेना शिंदे गटाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहेय, अशी टीका परबांनी केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 16:32 वाजता
शिंदे गटाची दसरा मेळावा मैदानासाठी धावपळ
Shinde Group on Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी शिंदे गटाची चांगलीच धावपळ सुरू आहे. शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसह पाच मैदानांसाठी अर्ज केले आहेत. शिवाजी पार्कसह क्रॉस मैदान, bkc, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सोमय्या मैदानासाठी या ठिकाणी परवानगी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज यावर चर्चा होऊन नक्की कोणत्या ठिकाणी दसरा मेळावा घेयायचा ते ठरणार आहे. सोमय्या किंवा रेसकोर्स मैदानावर मेळावा होण्याची जास्त शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 16:16 वाजता
मराठा आरक्षणाबाबत उद्या बैठक
Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या महत्वाची बैठक होणाराय... चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणाराय... मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर न्या. संदीप शिंदे आयोगानं मराठवाड्यात मराठा समाजाचे पुरावे गोळा करण्यासाठी नेमकं काय केलं, याचा आढावा यावेळी घेतला जाऊ शकतो. त्याशिवाय मराठा समाजासाठी राबवण्यात येणा-या सुविधा किती जणांपर्यंत पोहोचल्या, आणखी नवीन काही सुविधा मराठा समाजासाठी सुरू करता येतील का, याबाबतही उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.
9 Oct 2023, 15:24 वाजता
पवारांना हुकूमशहा म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे- संजय राऊत
Sanjay Raut : निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाकडून पवारांना हुकूमशहा म्हणण्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय...पवारांना हुकूमशहा म्हणणा-यांना लाज वाटली पाहिजे...दिल्लीतून आलेली स्क्रिप्ट वाचली जातेय, असं म्हणत राऊतांनी अजित पवार गटावर हल्लाबोल चढवलाय...तर बाळासाहेबांना विठ्ठल विठ्ठल बोलणा-यांनीच पक्ष फोडल्याची टीका शिंदे गटावर केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
9 Oct 2023, 14:37 वाजता
5 राज्यातील निवडणुका जाहीर, 3 डिसेंबरला निकाल
Assembly Election Dates for 5 States Announced : देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय.. तेलंगणा, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यात निवडणूक जाहीर झालीय.. छत्तीसगढमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होईल.. तर मध्य प्रदेशमध्ये 17 आणि राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल.. सर्व पाच राज्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.. या 5 राज्यांमध्ये मिळून विधानसभेच्या 679 जागा आहेत.. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीची ही लिटमस टेस्ट मानली जातेय..