Bharat Gogawale meet Sunil Tatkare : भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Bharat Gogawale meet Sunil Tatkare : भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात

9 Oct 2023, 14:03 वाजता

पनवेल, मुलुंड टोलनाक्यावर  मनसैनिक आक्रमक

 

MNS on Toll Naka : छोट्या गाड्यांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिला.. आणि त्यानंतर आता मनसैनिक आक्रमक झालेत.. टोलनाक्यावर मनसैनिक टोल न देताच गाड्या सोडून देत आहेत... हलक्या चारचाकी वाहनांकडून कोणताही टोल घेतला जात नाहीए.. पनवेलच्या शेडुंग आणि मुलुंड टोलनाक्यावर आक्रमक मनसैनिकांनी गाड्या फुकट सोडल्यायत.. टोलसाठी उपोषण करणारे मनसे नेते अविनाश जाधव मुलुंड टोलनाक्यावर प्रत्यक्ष उपस्थित आहेत.. तर पनवेल टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झालेत..

9 Oct 2023, 13:31 वाजता

शरद पवारांची दसऱ्याला पुण्यात सभा 

 

Sharad Pawar : दसऱ्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार. 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार पुण्यात घेण्यास सभा.राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात होणार शरद पवारांच्या सभेनं. शरद पवारांच्या सभेने होणार युवा संघर्ष यात्रेची सुरुवात. यात्रेची सांगता नागपूरच्या शरद पवारांच्या सभेनं होणार.

9 Oct 2023, 13:15 वाजता

महाराष्ट्र भाजप नेते प्रचारात उतरणार

 

BJP : निवडणूक आयोगाच्या वतीने पाच राज्यातील निवडणुकांचा वेळापत्रक जाहीर होताच भाजप कामाला लागली.महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपच्या नेत्यांना या सर्व राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरणार. भाजपचे आमदार यांना विशेष करून राजस्थान तेलंगणा मध्य प्रदेशमध्ये जबाबदारी दिली जाणार. या अगोदर देखील भाजपच्या आमदाराने या राज्यात जाऊन वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतला होता.

9 Oct 2023, 12:54 वाजता

प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार

 

Praful Patel : प्रफुल्ल पटेलांचा बालेकिल्ला गोंदियात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. 2 जुलैला राष्ट्रवादी फुटीनंतर हे सर्व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच होते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत  नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 11:15 वाजता

संजय राऊतांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

 

Sanjay Raut On Ajit Pawar : निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाकडून पवारांना हुकूमशहा म्हणण्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय...पवारांना हुकूमशहा म्हणणा-यांना लाज वाटली पाहिजे...दिल्लीतून आलेली स्क्रिप्ट वाचली जातेय, असं म्हणत राऊतांनी अजित पवार गटावर हल्लाबोल चढवलाय...तर बाळासाहेबांना विठ्ठल विठ्ठल बोलणा-यांनीच पक्ष फोडल्याची टीका शिंदे गटावर केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 10:56 वाजता

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात पोस्टमन गंभीर जखमी

 

Mumbai Stray Dogs Attack On Postman : मुंबईत भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय...मुंबईच्या पवई परिसरात व्हीनस बिल्डिंगजवळ पत्र देण्यासाठी पोहोचलेल्या पोस्टमनवर 5 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला...कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय...पोस्टमन आपलं काम करण्यासाठी जात असतानाच या कुत्र्यांनी घेरलं...आणि एकामागोमाग एक असे पाच कुत्रे पोस्टमनवर तुटून पडले...बिल्डिंग जवळील वॉचमन मदतीला आल्याने मोठा अनर्थ टळलाय...मात्र, या हल्ल्यात पोस्टमन गंभीर जखमी झालाय...त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...कुत्र्यांनी पोस्टमनवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय...या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून, महापालिकेने अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 10:53 वाजता

विधीमंडळ सचिवांची शिंदे आणि ठाकरेंना नोटीस

 

Thackeray Vs Shinde : शिवसेना कोणाची याबाबतचे पुरावे 2 आठवड्यात सादर करण्याची नोटीस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना जारी करण्यात आलीय. शिंदे ठाकरेंना विधीमंडळ सचिवांनी गेल्या मंगळवारी ही नोटीस बजावलीय. आता हे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांकडे 8 दिवसांची मुदत शिल्लक आहे. दोन्ही गटांना पक्षावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 10:07 वाजता

मेडिकलचे 180 विद्यार्थी अडचणीत

 

Mumbai Medical Student : मुंबईतल्या दोन मेडिकल महाविद्यालयातील जवळपास 180 विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. याला विद्यार्थीच जबाबदार ठरतायत. सायन, कूपर हॉस्पीटल आणि कॉलेजच्या प्रथम वर्ष वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी लेक्चर बंक करणं, ग्रुपने कॉलेजला दांडी मारणं याप्रकारामुळे अडचणीत आलेत. कॉलेजमध्ये पुरेशी उपस्थिती नसल्याने  या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी नियम मोडल्यामुळे त्यांना परीक्षा देता येणार नाहीय. महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 10:00 वाजता

शरद पवारांसोबतचे आमदार, खासदार अजितदादांसोबत?

 

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कुणाची हा संघर्ष निवडणूक आयोग तसंच सुप्रीम कोर्टातही सुरु आहे.. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आलीय.. शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांनी अजित पवारांची साथ दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. पाच आमदार आणि काही खासदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारी शपथपत्रे दिल्याचा दावा करण्यात आलाय.. अजित पवार गटातल्या एका मोठ्या नेत्यानेच हा दावा केलाय.. अजित पवारांवर विश्वास दाखवणा-या या नेत्यांचा वावर मात्र शरद पवारांसोबत दिसतोय.. पाच आमदारांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले दोन, उत्तर महाराष्ट्रातले दोन आणि मुंबई महानगर प्रदेशातल्या एका आमदाराचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -  

9 Oct 2023, 09:17 वाजता

राज्यात अन्नधान्य टंचाईचं सावट

 

Kharip Food Shortage : राज्यात अन्नधान्य टंचाईचं सावट आहे.. राज्यात 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे.. या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं खरिपातली पिकं करपून आणि जळून गेली आहेत.  त्यामुळे खरिपातल्या पिकांचं उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. पावसाअभावी कडधान्य, अन्नधान्यांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. असं झाल्यास पुढच्या वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -