Bharat Gogawale meet Sunil Tatkare : भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Bharat Gogawale meet Sunil Tatkare : भरत गोगावले सुनील तटकरेंच्या भेटीला, भेटीमागचं कारण गुलदस्त्यात

9 Oct 2023, 09:02 वाजता

16 हजार कोटींचा गंडा?

 

Thane Payement Gatway : पेमेंट गेटवे सेवा पुरवणा-या एका कंपनीचं बँक खातं सायबर गुन्हेगारांच्या टोळक्याने हॅक केलंय. हे खातं हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यातून तब्बल १६ हजार कोटींचे व्यवहार करण्यात आलेत. तर 25 कोटींची फसवणूक करण्यात आलीय. ठाणे पोलिसांनी हा प्रकार उघड केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र ठाण्यातल्या श्रीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यावर हा प्रकार उघड झाला. एप्रिल 2023 ला कंपनीचं पेमेंट गेटवे खातं हॅक करण्यात आल्याचं उघड झालंय. या प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 08:34 वाजता

एम.डी, एमएस कोटींच्या घरात?

 

Medical Post Graduation Fee Hike : मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट महाविद्यालयांनी भरमसाठ फी वाढ केलीय. ही फी वाढ वर्षाला जवळपास 2 लाख ते 20 लाखांच्या घरात आहे. मेडीकल पोस्ट ग्रॅज्युएट ऍडमिशनसाठी पर्सेंटाईल शुन्यावर आल्यामुळे विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ही शुल्कवाढ झालीय. केंद्राने अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे निकष शिथिल केलेत त्यामुळे वजा 40 गुण मिळालेले डॉक्टर्सही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पात्र झालेत. त्यामुळे एरवी रिक्त राहणा-या विषयांसाठीही विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढलेत. आता प्रवेशाच्या नियमित फे-या झाल्या आहेत. संस्था स्तरावर प्रवेश फेरीसाठी नोंदणी सुरू झालीय. बहुतेक खासगी मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेसची फी प्रतिवर्ष 10 लाखांहून अधिक आहे. आता त्यात 2 लाख ते 20 लाखांची वाढ झालीय.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 07:55 वाजता

NCPपक्ष, चिन्ह कुणाचं यावर आज सुनावणी

 

Sharad Pawar Vs Ajit Pawar : पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आज पुन्हा निवडणूक आयोगात रंगणार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं यावर ६ ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू झालीये. गेल्या शुक्रवारी अजित पवार गटाचा युक्तिवाद झाला. या दरम्यान दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचे दावे केले. तर अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलं जाऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी केलीय. शुक्रवारच्या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित होते. तर वकिलांनी अजित पवार गटाची बाजू मांडली. आता आज दुपारी ४ वाजता सुरू होणा-या सुनावणीत शरद पवार गट युक्तिवाद करणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 07:49 वाजता

पिंपरी-चिंचवडमध्ये 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट

 

Pimpri Fire : पिंपरी चिंचवडमध्ये 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट झालाय. 21 टन क्षमतेच्या टँकरमधून प्रोपिलिन गॅस अवैधरित्या भरताना हा स्फोट झाला. ही आग इतकी भीषण होती की रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या 3 स्कूल बस जळून खाक झाल्यात. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. याप्रकरणी अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 07:48 वाजता

दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी

 

SSC & HSC Exam : दहावी आणि बारावी बोर्डाच्या किती परीक्षा द्यायच्या? हे आता विद्यार्थीच ठरवणार आहे...नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षेची सक्ती राहणार नाहीये...तसंच विद्यार्थ्यांना वर्षातून दोन परीक्षांचा पर्यायही असणार आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय...बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मानसिक दडपण कमी करण्याच्या दृष्टीने हा पर्याय देण्यात आलाय...वर्षातून दोन परीक्षांचा पर्याय दिल्यामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल...एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर दुसऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याची संधी विद्यार्थ्याला मिळू शकते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Oct 2023, 07:46 वाजता

अभिनेता शाहरुख खानला Y+ दर्जाची सुरक्षा

 

Shahrukh khan : किंग खान शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.. शाहरुख खानला आता Y+ सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे... पठाण आणि जवान या सिनेमांच्या रिलीजनंतर शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलीय.. Y+ मुळे शाहरुखच्या सुरक्षेत 24 तास सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तैनात राहतील... तर शाहरुखचं निवासस्थान मन्नतबाहेर 5 बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात असतील.. शाहरुखला याआधी सुरक्षेसाठी फक्त दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात होते.  शाहरुखआधी फक्त सलमान खानला Y+ सुरक्षा देण्यात आलीय.. तर अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -