11 Dec 2023, 08:33 वाजता
उद्धव ठाकरे आज अधिवेशनात उपस्थित राहणार
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत.. दुपारी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल होतील.. तर संध्याकाळी उद्धव ठाकरे बैठकही घेणार आहेत.. या बैठकीला विदर्भातल्या महिला आघाडीच्या प्रतिनिधी उपस्थित असतील.. त्यानंतर रात्री ठाकरे गटाच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे स्नेहभोजन करणार आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
11 Dec 2023, 08:01 वाजता
काँग्रेसचा मोर्चा आज अधिवेशनावर धडकणार
Nagpur Congress Andolan : शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली असून आज अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे... अवकाळीने राज्यात शेतक-यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतक-यांच्या मदत देण्याच्या मागणीसाठी हा हल्लाबोल करण्यात येणार आहे.. तसंच वाढलेली महागाई आणि बेरोजगारीविरोधातही काँग्रेसचा हा मोर्चा असेल... दिक्षाभूमीवरुन काँग्रेसच्या या मोर्चाला सुरुवात होऊन तो अधिवेशनावर धडकेल...हजारो काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
11 Dec 2023, 07:20 वाजता
UIDAIकडून आधार कार्ड संदर्भात मोठा बदल
Aadhar Card : फिंगरप्रिंट शिवायही आता आधार कार्ड बनवता येणारेय. UIDAIनं हा सर्वात मोठा बदल केलाय. ज्यांचे बोटांचे ठसे व्यवस्थित उमटत नाहीत, ज्यांना हातच नाही अशा व्यक्तींना आधार कार्ड काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यांच्यासाठी UIDAI नं आयरिस स्कॅनचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. आयरिस स्कॅनमध्ये डोळे स्कॅन केले जातात. त्यामुळे ज्यांच्या फिंगरप्रिंट घेण्यात अडचणी आहेत. त्यांचे डोळे स्कॅन करून आधार कार्ड बनविण्यात येईल. UIDAI नं यासंदर्भात एक्स हँडलवर माहिती दिलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
11 Dec 2023, 07:12 वाजता
अवकाळीवर आज विधानसभेत चर्चा
Nagpur Winter Session : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा होणाराय.. प्रश्नोत्तराच्या तासानंतर अवकाळीच्या मुद्यावर अल्पकालीन चर्चा होणाराय...अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात अडकलाय...अवकाळीने प्रचंड नुकसान झालं असून, शेतक-यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चेची दाखवली होती.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर चर्चेला परवानगी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-