Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय मूदतीपूर्वीच लागणार?

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय मूदतीपूर्वीच लागणार?

11 Dec 2023, 12:28 वाजता

'मुंबई महापालिकेत ठाकरेंनी हातसफाई केली', मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप

 

Eknath Shinde on Aditya Thackeray : मुंबई महापालिकेत ठाकरेंनी हातसफाई केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय.. येत्या निवडणुकीत जनताच ठाकरेंची सफाई करणार असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय... मुंबईतल्या डीप क्लिनिंग कॅम्पेनमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचरा वाहून ट्रॅक्टर चालवला. त्यावरु आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. त्यावरच आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Dec 2023, 12:04 वाजता

पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचा भाव घसरला

 

Pimpalgaon Onion Rate : कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सरासरी 1500 रुपयांनी उतरलेयत...तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जाणारा कांदा आज अडीच हजार रुपये दराने विकला जातोय...सध्या उत्पादित होणारा लाल कांदा जास्त टिकू शकत नसल्याने शेतकऱ्याला तातडीने विकणे भाग असते...त्यामुळे मिळेल तो भाव पदरात पाडून घेण्याचा कल शेतकऱ्यांचा दिसून आलाय...आज दुपारी लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरू होणार आहे...त्यानंतर टप्प्याटप्प्यांना सर्वच बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीला सुरुवात होईल...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Dec 2023, 11:25 वाजता

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच- सुप्रीम कोर्ट

 

Supreme Court Verdict on Article 370: जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय...सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठातील सरन्यायाधीशांसह तीन न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलाय...
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतील ‘कलम 370’ रद्द केलं...आणि या राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली...केंद्राचा हा निर्णय संविधानाला धरूनच असून, जम्मू-काश्मीरला भारताचंच संविधान लागू असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय...या निकालानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Dec 2023, 11:07 वाजता

'ठाकरेंनी भाजपशी युतीचं आश्वासन दिलेलं', उदय सामंत यांचा दावा

 

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीत उदय सामंतांनी दोन गौप्यस्फोट केलेयत...व्हीप हा केवळ सभागृहाच्या कामकाजासाठी जारी केला जातो..मात्र, मला दाखवलेला कागद व्हीप नसून पत्र असू शकतं, असं पत्र खाजगी कार्यक्रमासाठी दिलं जाऊ शकतं...त्यावरील सही माझी नसल्याचा दावा सामंतांनी केलाय...तर त्याआधी मविआ सरकारमध्ये शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं...शिंदेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंना भेटलो होतो असं सामंतांनी म्हटलंय...ठाकरेंनी आश्वासन दिल्याने मी मंत्रिमंडळात सामील झाल्याचा दावा सामंतांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Dec 2023, 10:59 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'कांदा प्रश्नावर गोयल यांच्याशी चर्चा','नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार','युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश','पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार','इथेनॉलसंबंधी दिल्लीत चर्चा करणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.

 

11 Dec 2023, 10:33 वाजता

पीडित महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

Victimized Woman : हिवाळी अधिवेशनात महिला धोरण आणण्याआधी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय...बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मनोधैर्य योजनेचा निधी 10 लाखांपर्यंत वाढवलाय...यासोबतच पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थाचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेयत...याआधी 1 लाखांची मदत मिळायची...मात्र, आता 10 लाख रुपये मदत मिळणार आहे...योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, तसेच वन स्टेप सेंटरचे केंद्र प्रशासक यांचा समावेश असेल...

11 Dec 2023, 10:10 वाजता

Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कांद्यासंदर्भात नितीन गडकरींना भेटलो','दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार','फडणवीसांसोबत अमित शाहांची भेट घेणार','शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणार','शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकार निर्णय घेईल', 'कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसणारा निर्णय घेणार', मराठा आरक्षणासंदर्भात  अजित पवार यांची प्रतिक्रिया.

 

11 Dec 2023, 09:37 वाजता

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

Gopichand Padalkar : भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. मराठा समाजाच्या 10 ते 15 अज्ञात आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.. इंदापूरच्या प्रशासकीय भवनासमोर दूध दरवाढीच्या मागणीसाठी दीपक काटे उपोषणाला बसले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी गोपीचंद पडळकर आले होते. तेव्हा मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चप्पलफेक केली तसंच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली होती..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

11 Dec 2023, 09:03 वाजता

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी उदय सामंतांची आज साक्ष नोंदवणार

 

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय... मंत्री उदय सामंत यांची आज उलटतपासणी सुरु आहे... मंत्री दीपक केसरकरांची आज उलटतपासणी केली जाणार होती.. मात्र त्याऐवजी आता उदय सामंत आज आपली साक्ष नोंदवतायत. याआधी झालेल्या सुनावणीत खासदार राहुल शेवाळेंची उलटतपासणी करण्यात आली... शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदेच असल्याचा दावा या सुनावणीवेळी राहुल शेवाळेंनी केला होता.. राहुल शेवाळेंची उर्वरित उलटतपासणी आता मंगळवारी होणार आहे...

11 Dec 2023, 08:38 वाजता

पिंपळगाव  बाजार समितीत आजपासून कांदा लिलाव

 

Pimpalgaon Market Committee : आजपासून पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे...कांदा निर्यातबंदी केल्यानं गेल्या तीन दिवसांपासून कांदा लिलाव बंद होता...मात्र, पिंपळगाव बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालीय...त्यामुळे कांदा खराब होऊ नये यासाठी शेतक-यांच्या हितासाठी व्यापा-यांनी कांदा लिलावाचा निर्णय घेतलाय...नाशिक जिल्ह्यातील ठप्प झालेल्या बाजार समित्या आजपासून खुल्या होतायत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-